मुंबई : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आणखी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. स्मारकाच्या कामाला गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सिंदखेडराजा येथील जिजाऊसृष्टी आणि स्मारकाच्या विकासासाठी २०२४ मध्ये ५० कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता. या निधीतून सिंदखेडराजा परिसरातील जिजाऊसृष्टीच्या कामाला सुरुवात झाली. आतापर्यंत या कामावर सुमारे २७ कोटी रुपये खर्च झाले असून काम सध्या प्रगतीपथावर आहे.
मात्र, सिंदखेडराजा शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील प्रत्यक्ष राजमाता जिजाऊ स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आणखी ५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निधीतून स्मारकासह परिसरातील रस्ते आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे.
स्थानिक नगरपालिकेकडून प्रस्ताव मागवून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या विकासकामांना गती देण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊंच्या ऐतिहासिक वारशाला साजेसे स्मारक उभारून परिसराचा पर्यटनदृष्ट्याही विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
या बैठकीला मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनील भुसारा तसेच माजी आमदार शशिकांत खेडेकर उपस्थित होते.
जनगणनेतील OBC कॉलमवर काँग्रेसचे मोठे अभियान; राहुल गांधींच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक
आमदार मनोज कायंदे यांच्या आश्वासनानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे
खामगाव-शेगाव पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठे बदल; पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली
लोणार सरोवराच्या विकासाला मोठी चालना; ४२.७९ कोटींचा निधी मंजूर
