By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > देऊळगावराजा > आमदार मनोज कायंदे यांच्या आश्वासनानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे
देऊळगावराजाराजकीयविदर्भसिंदखेडराजा

आमदार मनोज कायंदे यांच्या आश्वासनानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे

Team Batmivishwa
Last updated: August 18, 2026 12:58 pm
By Team Batmivishwa
Published: August 18, 2026
देऊळगावराजा राजकीय विदर्भ सिंदखेडराजा
94 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा नगरपरिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाला बसलेल्या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आमदार मनोज कायंदे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. बी. एम. भगत आणि रा. ब. गोरे यांनी १५ ऑगस्टपासून नगरपरिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. नगरपरिषदेच्या आस्थापनेवर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर उपदान (ग्रॅच्युइटी) तसेच रजा रोखीकरणाची रक्कम देणे ही नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप हे लाभ मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

उपोषणाची नगरपरिषद अध्यक्ष माधुरी शिपणे यांनी दखल घेत आमदार मनोज कायंदे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आमदार कायंदे यांनी संबंधित यंत्रणेला शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना दिल्या. अध्यक्षांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर भगत आणि गोरे यांनी उपोषण मागे घेतले.

दरम्यान, शासनाच्या नगरविकास विभागाने ९ जून २०१६ रोजीच्या आदेशानुसार नगरपरिषदांना मिळणाऱ्या विविध अनुदानांपैकी तसेच मुद्रांक शुल्क, गौण खनिज, बिगरशेती सारा, करमणूक कर आणि घरपट्टीच्या वसुलीतील २० टक्के रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा अदा करण्यासाठी वापरण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगण्यात आले. तसेच ३१ मे २००२ रोजीच्या स्थायी निर्देशानुसार उपदानाची रक्कम देय झाल्यापासून तीन महिन्यांनंतरही प्रशासकीय कारणामुळे रक्कम अदा न झाल्यास, संबंधित कर्मचाऱ्याला तीन महिन्यांनंतरच्या कालावधीसाठी व्याज देण्याची तरतूद असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, या निर्देशांनंतरही अनेक कर्मचाऱ्यांना मूळ उपदानाची रक्कमच मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

उपदानाची रक्कम आणि रजा रोखीकरणाची थकीत रक्कम व्याजासह मिळावी, या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले होते. नगरपरिषद अध्यक्ष माधुरी शिपणे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड यांच्या पुढाकाराने आणि आमदार मनोज कायंदे यांच्या सहकार्याने उपोषणाची सांगता झाली.  यावेळी संतोष खांडेभराड, धनशिराम शिपणे, प्रदीप वाघ, गोविंद तिडके, शौकत भाई, दिलीप झोटे, सुनील शेजुळकर, आदर्श गुप्ता, तुषार शिपणे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

खामगाव-शेगाव पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठे बदल; पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली

मलकापूर बसस्थानकात चार ते पाच बसची तोडफोड

 

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

You Might Also Like

बुलढाण्यात काँग्रेसचा भाजपवर ‘मतचोरी’चा आरोप; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
शाळांमधील विद्यार्थ्यांचा आहार सकस आणि दर्जेदार असलाच पाहिजे; तुकाराम मुंढेंचा स्पष्ट आदेश
बेकायदा वाळू उत्खननावर सरकारचा कडक प्रहार; आता स्वामित्वधनाच्या दहापट दंडाची तरतूद
शारदा ज्ञानपीठचा दुहेरी जल्लोष; सुब्रोतो फुटबॉल कपमध्ये दोन्ही गटांचे जिल्हा विजेतेपद
पाच महिन्यापासून जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांचा कामाचा हक्काचा मोबदला थकीत
TAGGED:Buldhana NewsDeulgaon Raja Municipal CouncilDeulgaon Raja NewsEmployee Hunger StrikeGratuity PaymentLeave EncashmentMaharashtra NewsManoj KayandeMLA Manoj KayandeMunicipal Council EmployeesRetired EmployeesRetired Employees ProtestRetirement BenefitsRetirement Benefits Maharashtraआमदार मनोज कायंदेउपदान रक्कमउपदानाची थकीत रक्कमकर्मचारी उपोषणदेऊळगाव राजा नगरपरिषददेऊळगाव राजा बातमीनगरपरिषद कर्मचारीनगरपरिषद प्रशासननिवृत्ती लाभनिवृत्ती वेतन लाभबुलढाणा बातम्यामनोज कायंदेरजा रोखीकरणसेवानिवृत्त कर्मचारीसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
Next Article जनगणनेतील OBC कॉलमवर काँग्रेसचे मोठे अभियान; राहुल गांधींच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up