By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > ‘शांतीत क्रांती’ करणाऱ्या बुधवतांची राजकीय पकड पुन्हा अधोरेखित
बुलडाणाबुलडाणा जिल्हामलकापूरमोताळाराजकीयसमोरच्या बाकावरुनसिंदखेडराजा

‘शांतीत क्रांती’ करणाऱ्या बुधवतांची राजकीय पकड पुन्हा अधोरेखित

Team Batmivishwa
Last updated: August 12, 2026 12:07 am
By Team Batmivishwa
Published: August 12, 2026
बुलडाणा बुलडाणा जिल्हा मलकापूर मोताळा राजकीय समोरच्या बाकावरुन सिंदखेडराजा
192 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी जालिंदर बुधवत बिनविरोध

व्हीजेएनटी मतदारसंघातून ९ उमेदवारांची माघार

बुलढाणा (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत व्हीजेएनटी अर्थात विमुक्त जाती-भटक्या जमाती राखीव मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी तब्बल नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने बुधवत यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

Contents
‘शांतीत क्रांती’ची राजकीय शैलीसहकार क्षेत्रातील प्रवेशाने राजकीय वजन वाढणार

व्हीजेएनटी मतदारसंघातून गणपत कुसळकर, किरण विनायक राठोड, जंगलसिंग राठोड, रामविजय बुरुंगले, उषा भगवान मुंडे, हिरासिंग घोती, उज्वला गणेश मोरे, गणेश मुख्त्यारसिंग मोरे आणि शिवराज तोतराम कायंदे यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. परिणामी जालिंदर बुधवत यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली.

‘शांतीत क्रांती’ची राजकीय शैली

जालिंदर बुधवत यांच्या राजकीय वाटचालीत त्यांची ‘शांतीत क्रांती’ करणारा नेता अशी ओळख निर्माण झाली आहे. कोणताही गाजावाजा न करता राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळविण्याची त्यांची शैली या निवडणुकीतही दिसून आली.

मासरूळ जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी कमलताई बुधवत यांनी जोरदार लढत देत विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. जालिंदर बुधवत यांनी सोयगावचे माजी सरपंच, शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच दोन वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम करत जिल्ह्यातील राजकारणात आपली पकड मजबूत केली आहे.

सहकार क्षेत्रातील प्रवेशाने राजकीय वजन वाढणार

बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने बुधवत यांच्या राजकीय कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे. सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या संस्थेत प्रवेश मिळाल्याने त्यांच्या राजकीय वजनातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘मातोश्री’च्या अत्यंत जवळचे म्हणूनही जालिंदर बुधवत यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील त्यांची बिनविरोध निवड ही केवळ सहकार क्षेत्रातील यश नसून आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. जालिंदर बुधवत यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी जल्लोष करत बुधवत यांचे अभिनंदन केले.

‘ना… ना’ करता करता अखेर त्याच पक्षाच्या प्रेमात!

दलित पँथर चळवळीचा संघर्ष रुपेरी पडद्यावर; पाच भाषांमध्ये संपूर्ण भारतात झळकणार

स्वातंत्र्यदिनी जन्मलेला जवान… देशासाठी जगला आणि देशासाठीच गेला..

You Might Also Like

पळसखेड चक्काचे रहिवासी डॉ.रणजीत मंडाले यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) पदाची धुरा
वाढदिवशीच अमरण अन्नत्यागाचा निर्धार!
बुलढाणा जिल्ह्यात अत्याधुनिक ‘एस-3’ ईव्हीएम उपलब्ध; मतदान प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद; व्यसनमुक्तीपासून स्क्रीनटाइम कमी करण्यापर्यंत दिला संदेश
मेहकरच्या नागेश कांगणे यांच्या अभंग रचनांना विदर्भ साहित्य परिषदेचा सन्मान
TAGGED:जालिंदर बुधवतजालिंदर बुधवत निवडजालिंदर बुधवत बिनविरोधजालिंदर बुधवत राजकीय कारकीर्दजिल्हा केंद्रीय सहकारी बँकजिल्हा बँक संचालकबुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीला चांडोळ येथे ५ एकर जागा मंजूर; उपबाजारामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासाबुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक निवडणूकबुलढाणा जिल्हा बँकबुलढाणा जिल्हा बँक निवडणूकबुलढाणा राजकारणमातोश्री जालिंदर बुधवतविमुक्त जाती भटक्या जमातीव्हीजेएनटी मतदारसंघशिवसेना जिल्हाप्रमुखसहकार क्षेत्र बुलढाणा
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article खामगाव-जालना रेल्वेमार्गाला मिळणार गती!
Next Article आज शेलसुर गावातून अस्थिकलश यात्रा काढण्यात येणार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up