मोताळा (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यात मतदारांच्या माहितीचे शंभर टक्के डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले असून, या कामगिरीमुळे मोताळा तालुका बुलढाणा जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
या मोहिमेदरम्यान तालुक्यातील १५७ मतदान केंद्रांवरील १ लाख ३४ हजार ३४६ नोंदणीकृत मतदारांच्या घरोघरी जाऊन माहितीची पडताळणी करून अचूक डिजिटल नोंदणी करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया नियोजित वेळेत आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आली.
या मोहिमेसाठी १५७ बीएलओ, १६ क्षेत्रीय अधिकारी, ३१ पर्यवेक्षक आणि ४ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. प्रतिकूल परिस्थितीतही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून माहितीचे संगणकीकरण करण्यात आले.
या कामात स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, सेतू चालक, ग्रामपंचायत सरपंच व कर्मचारी, शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महसूल विभाग, सहकारी कर्मचारी, राजकीय प्रतिनिधी तसेच नागरिकांनीही मोलाचे सहकार्य केले.
मोताळा तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सरिता पाटील यांनी या यशासाठी योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शरद पाटील आणि उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार यांच्या निर्देशानुसार ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना (उबाठा) पक्षाचा ८ ऑगस्ट रोजी खामगावात भव्य कार्यकर्ता मेळावा
नशामुक्त युवा फॉर विकसित भारत 2.0 अंतर्गत समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीत विविध जनजागृती उपक्रम
अंबिका अर्बन बँकेचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कोठारी पंढरपूर साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी
ICC कडून 2027 वनडे विश्वचषक क्वालिफायरच्या तारखा जाहीर; वेस्ट इंडिजवर पुन्हा संकट
