देऊळगाव राजा / प्रतिनिधी : ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत 2.0’ या अभियानांतर्गत समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) विभागाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता, व्यसनमुक्ती जनजागृती, पथनाट्य, योगा सत्र आणि व्याख्यान अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, सचिव सतीश कायंदे आणि सहसचिव तथा आमदार मनोज कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. रा.से.यो. स्वयंसेवकांनी देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी व्यसनमुक्तीवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने योगा सत्राचेही आयोजन करण्यात आले.
यावेळी “व्यसनमुक्त तरुण, समृद्ध राष्ट्र” या विषयावर प्रा. किशोर चराटे यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व, तरुणांनी व्यसनांपासून दूर राहण्याची गरज आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रफुल ताठे यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या सूचनेनुसार व उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम लड्डा, प्रा. किशोर चराटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. निवृत्ती पंडित, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. वैभव चव्हाण, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. शीतल रघुवंशी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
ICC कडून 2027 वनडे विश्वचषक क्वालिफायरच्या तारखा जाहीर; वेस्ट इंडिजवर पुन्हा संकट
संविधान सप्ताहानिमित्त सिंदखेडराजात भव्य संविधान जनजागृती रॅली; संविधान मूल्यांचा जागर
अंबिका अर्बन बँकेचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कोठारी पंढरपूर साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी
