वाडी ब्रम्हपुरी (ता. चिखली) : जगविख्यात साहित्यिक, साहित्यरत्न तथा लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाडी ब्रम्हपुरी येथे उत्साह, जल्लोष आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातून डीजेच्या तालावर काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. युवक-युवती, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शिस्तबद्ध व शांततेत जयंती उत्सव साजरा केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मातंग सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाई छोटू कांबळे, कृष्णा साळवे, कामगार नेते गजानन पवार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गुलाबराव जाधव, सरपंच संदीप वानखेडे, उपसरपंच अंबादास वानखेडे, माजी सरपंच चंद्रकांत वानखेडे, माजी सरपंच दीपक जाधव, बंडू सर, राजेंद्र वानखेडे, शिवसेना नेते दिलीपराव वानखेडे, नामदेव जाधव, किन्होळ्याचे सरपंच वसंता जाधव, किशोर निकाळजे, पोलीस पाटील परशुराम अंभोरे, शेख जिया भाई, तुकाराम जाधव, बिट जमादार अनिल वाघ तसेच रायटर अमोल इंगळे यांनीही पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
जयंती सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रल्हाद नाटेकर, पंजाब नाटेकर, मोहन नाटेकर, विजय नाटेकर, प्रमोद नाटेकर, संतोष साळवे, ज्ञानेश्वर नाटेकर, अनिल नाटेकर, अंकुश नाटेकर, किशोर नाटेकर, शंतनू निकाळजे, शाम घाडगे, ओम दुतोंडे, शुभम नाटेकर, वेदांत साळवे यांच्यासह अनेक युवकांनी विशेष परिश्रम घेतले. महिला भगिनींचाही मोठ्या संख्येने सहभाग लाभला.
यावेळी ग्रामस्थांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक एकात्मता, बंधुभाव आणि परिवर्तनाचा संदेश दिला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या जयंती सोहळ्यामुळे वाडी ब्रम्हपुरी परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
ICC कडून 2027 वनडे विश्वचषक क्वालिफायरच्या तारखा जाहीर; वेस्ट इंडिजवर पुन्हा संकट
संवेदनशिल गाव उटी अन् कॉल करुन दारुड्याने पोलीसांना फिरवलं.. कुठी कुठी
