By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन; मराठी काव्यविश्वातील समृद्ध पर्व संपले
बुलडाणाविदर्भसमोरच्या बाकावरुन

ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन; मराठी काव्यविश्वातील समृद्ध पर्व संपले

Team Batmivishwa
Last updated: August 15, 2026 7:34 am
By Team Batmivishwa
Published: August 15, 2026
बुलडाणा विदर्भ समोरच्या बाकावरुन
76 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मराठी काव्यविश्वात संवेदनशील, सुसंस्कृत आणि विचारशील लेखणीने स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ कवी दत्तात्रेय भास्कर (द. भा.) धामणस्कर यांचे आज निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने शब्दांचे मर्म जाणणारा ऋजू, संवेदनशील आणि विचारवंत कवी गमावला आहे. गेल्या अनेक दशकांपासून ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. द. भा. धामणस्कर यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३० रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांत एम.ए. पदवी घेतली. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेत त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. १९८८ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. सप्टेंबर १९६० पासून ते डोंबिवलीचे रहिवासी होते. डोंबिवलीच्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्राशी त्यांचे अतूट नाते होते. येथील ‘काव्यरसिक मंडळा’च्या सुरुवातीपासूनच्या सक्रिय सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होता.

रंगरेषांतून मानवी वेदनांना मूर्त स्वरूप देणारे श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली

धामणस्कर यांनी वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी पहिली कविता लिहिली. पुढे ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘कविता-रती’, ‘दीपावली’, ‘हंस’ आणि ‘मराठवाडा’ यांसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. ग्रंथालीच्या ‘दशकाची कविता’ या महत्त्वपूर्ण संकलनातील दहा निवडक कवींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. साहित्य अकादमीच्या साठोत्तरी मराठी कवितेच्या संकलनात तसेच ज्ञानपीठाच्या ‘भारतीय कवितायें १९८३’ या ग्रंथात त्यांच्या पाच कवितांचा समावेश झाला.

त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झाले. त्यांच्या कवितांनी प्रगल्भ वाचकांसोबतच विद्यार्थी वर्गावरही प्रभाव टाकला. महाराष्ट्र सरकारच्या इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मानवी मूल्यांची जपणूक करणारी त्यांची ‘वस्तू’ ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच कर्नाटक सरकारच्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘कंदील विकणारी मुले’ या कवितेचा समावेश करण्यात आला होता.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवी म्हणून त्यांनी सहभाग घेतला. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील त्यांचे कवितावाचनही लोकप्रिय झाले. ‘दिवे असावे’, ‘वस्तू’, ‘हस्तांतर’ यांसह त्यांच्या विविध कवितांमधून मानवी नाती, संवेदना, परंपरा, निसर्ग आणि जीवनमूल्यांचे प्रभावी दर्शन घडते.

द. भा. धामणस्कर यांच्या निधनाने मराठी काव्यक्षेत्रातील एक समृद्ध पर्व संपले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल साहित्यवर्तुळातून शोक व्यक्त होत असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यात ३५२ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी अर्ज मागविले

You Might Also Like

“फुटबॉलचा महाकुंभ – २०२६ चा रणसंग्राम”! फिफा विश्वचषक २०२६
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲग्रिटेक नाविन्यता केंद्राला मिळणार व्यवस्थापकीय संचालक
पावसाने फिरवली पाठ, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! चिखली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
गुरुवार व शुक्रवारला मंत्री अ‍ॅड. निलेश हेलांडे पाटील बुलढाणा जिल्हा दौरावर
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा!
TAGGED:D B DhamankarDatta B DhamankarMarathi LiteratureMarathi Poetकंदील विकणारी मुलेकवी धामणस्करज्येष्ठ कवी द. भा. धामणस्करज्येष्ठ साहित्यिक निधनडोंबिवली साहित्यद. भा. धामणस्करद. भा. धामणस्कर निधनद. भा. धामणस्कर श्रद्धांजलीदत्तात्रेय भास्कर धामणस्करदिवे असावेधामणस्कर कवितामराठी कवीमराठी काव्यमराठी काव्यविश्वमराठी साहित्यमराठी साहित्यविश्ववस्तू कवितासाहित्यिक निधनहस्तांतर कविता
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article बुलढाण्यात १७ ऑगस्टला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
Next Article वामनदादांची गीते म्हणजे आंबेडकरी चळवळीचा आत्मा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up