शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट देणार भेट
बुलढाणा- तहसिलदार, मोताळा यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट देण्याकरीता कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष(राज्यमंत्री दर्जा) अॅड.निलेश हेलांडे पाटील हे गुरुवार दि. ११, शुक्रवार दि.१२ जुन २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहे.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार गुरुवार दि. ११ जुन रोजी रात्री ९ वाजता अमरावती येथून शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार दि १२ जुन रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह येथून मोताळाकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता तहसिलदार, मोताळा यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट. दुपारी १२ वाजता मोताळा येथून नांदुराकडे प्रयान. दुपारी १.३० वाजता तहसिलदार, नांदुरा यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट. दुपारी २.३० वाजता साईनुसार अमरावतीकडे प्रयाण करतील.
११ देश पार करून रस्ते मार्गाने ‘ग्लोबल दिंडी’ येणार विठ्ठल-रुख्माईच्या भेटीला
