बुलढाण्यात १८ केंद्रांवर मतदान; २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया
बुलढाणा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ८१ मतदान केंद्रे उभारण्याच्या प्रस्तावाला भारत निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रांचा समावेश असून, २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी ही माहिती दिली. मतदान केंद्रांच्या प्रस्तावाला आयोगाने मान्यता दिल्याचे पत्र महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना पाठविले आहे.
जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांचे वितरण पुढीलप्रमाणे आहे.
- अमरावती – २५
- अकोला – १३
- बुलढाणा – १८
- वाशिम – ७
- यवतमाळ – १८
या सर्व जिल्ह्यांतील मिळून ८१ मतदान केंद्रांवर निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
२३ ऑक्टोबरला मतदान
निश्चित कार्यक्रमानुसार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारीला वेग येणार असून, संबंधित जिल्ह्यांतील मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सहकारातून समृद्धीचा मंत्र देणारे लोकनेते स्व. भास्कररावजी शिंगणे
बुलढाणा पुरवठा विभागाच्या कारभारावर नागरिकांचा संताप; वारंवार चकरा मारण्याची वेळ!
