बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचा वंजारी समाज बांधवांकडून सत्कार
बुलढाणा : बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख श्री. जालिंदर बुधवत यांची बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड झाल्याबद्दल बुलढाणा शहरातील वंजारी समाज बांधवांच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समाज बांधवांनी श्री. जालिंदर बुधवत यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या सत्कार समारंभास श्री. रामराव आघाव, श्री. प्रल्हाद केदार, श्री. ब्रदीनाथ कायंदे, श्री. प्रकाश नागरे, श्री. गजानन खार्डे, श्री. अनिल वारे, श्री. अजित पालवे, श्री. अनिल इलग, पत्रकार श्री. प्रवीण थोरात, श्री. जगन जायभाये, श्री. हरिदास दराडे, श्री. घुगे सर, श्री. देवानंद ताठे, श्री. सुधाकर मुंढे मामा, श्री. किरण दराडे यांच्यासह वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी बुधवत यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. समाजाच्या विविध प्रश्नांसाठी तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल, अशी भावना उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या KYC व तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करा : विजय इतवारे
पालकमंत्री मकरंद पाटील १३ ते १५ ऑगस्टदरम्यान बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर
