नवी दिल्ली : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून निवडणूक आयोगावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्यास त्यांच्याविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा चिदंबरम यांनी दिला. अखेरीस त्यांना पदावरून पायउतार व्हावेच लागेल, असा दावाही त्यांनी केला.
चिदंबरम म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांना कधी ना कधी राजीनामा द्यावाच लागेल, याबाबत आपल्याला कोणतीही शंका नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःहून लवकरात लवकर राजीनामा देणेच योग्य ठरेल. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नाही तर आंदोलन थांबणार नसून ते अधिक तीव्र केले जाईल.
SIR प्रक्रियेच्या मुद्द्यावर INDIA आघाडीसह विविध सामाजिक आणि राजकीय संघटना विरोध करत असून आंदोलनाच्या माध्यमातून सरकार आणि निवडणूक आयोगावर दबाव वाढविला जात असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता असून, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
अमरावती शिक्षक मतदारसंघ : शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर सर सोमवारला अर्ज भरणार
