By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > बुलढाणेकरांचा सवाल एकच—रस्ते कधी सुधारणार आणि खड्ड्यांचा वनवास कधी संपणार?
बुलडाणा

बुलढाणेकरांचा सवाल एकच—रस्ते कधी सुधारणार आणि खड्ड्यांचा वनवास कधी संपणार?

Team Batmivishwa
Last updated: August 13, 2026 9:19 am
By Team Batmivishwa
Published: August 13, 2026
बुलडाणा
20 Views
3 Min Read
Share
3 Min Read
SHARE

बुलढाणा : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, “रस्त्यावरून जातोय की खड्ड्यांमधून?” असा संतप्त सवाल बुलढाणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था पावसाळ्यात अधिकच बिकट झाली असून, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

शहरातील काही ठिकाणी खड्डे इतके मोठे झाले आहेत की, वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात किंवा खड्डा चुकविण्यासाठी वाहन दुसऱ्या दिशेने वळवावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “कर भरतो, रस्त्यावरून प्रवास करतो; मग सुरक्षित रस्ता मिळणे हा आमचा अधिकार नाही का?” असा सवाल नागरिक करत आहेत. सोशल मीडियावरही शहरातील खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी आणि खड्डे बुजविण्याची कामे होणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी अद्यापही परिस्थिती जैसे थे आहे. काही ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले असले तरी निकृष्ट कामामुळे पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाल्याची नागरिकांची तक्रार आहे.

“खड्डे बुजवा, नाहीतर अपघाताची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल आता बुलढाण्याची पब्लिक प्रशासनाला विचारत आहे. नागरिकांच्या वाढत्या संतापाची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने शहरातील रस्त्यांची पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

बुलढाणेकरांचा सवाल एकच—रस्ते कधी सुधारणार आणि खड्ड्यांचा वनवास कधी संपणार?

जांभरुण रोडवरील भला मोठा खड्डा; अपघाताची भीती, नागरिक संतप्त

 शहरातील बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या जांभरुण रोडवर डॉ. वानेरे हॉस्पिटलसमोर भला मोठा खड्डा पडल्याने वाहनधारकांसह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असून, नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

जांभरुण रोड परिसरात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्स आणि मेडिकल दुकाने असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठी वर्दळ असते. त्यातच शालेय विद्यार्थ्यांचीही या मार्गावरून दररोज ये-जा सुरू असते. त्यामुळे रस्त्यावरील खड्डा चुकविताना वाहनचालक तसेच विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असल्याने रस्त्याची अवस्था आणखी खराब झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यावरील खड्डा आणि खराब झालेल्या मार्गामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरपालिकेने वेळीच या समस्येकडे लक्ष देऊन खड्डा बुजविण्यासह रस्त्याची दुरुस्ती करावी. अन्यथा एखादा अपघात घडल्यानंतर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

You Might Also Like

बुलडाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना पीएम रिलीफ फंडातून १ कोटी २० लाखांची मदत
बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचा वंजारी समाज बांधवांकडून सत्कार
एफएमजी परीक्षेत हाफिज अहमद उसामा यांचे उल्लेखनीय यश
आषाढी एकादशीनिमित्त २५ जुलै रोजी श्री गजानन महाराज संस्थानतर्फे भव्य दिंडी सोहळा
पक्षनिष्ठा ही केवळ राजकीय बाब नसून नैतिक मूल्य आहे : सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र एन.जैन
TAGGED:Buldhana Newspeople of Buldhana?What do you sayअपघाताचा धोकाखराब रस्ताजांभरुण रोडजांभरुण रोड खड्डाडॉ. वानेरे हॉस्पिटलनगरपालिकेचा निष्काळजीपणानागरिकांची मागणीबुलडाणा नगरपालिकाबुलडाणा न्यूजबुलडाणा बस स्थानकबुलडाणा शहरबुलडाणा शहरातील समस्यामेडिकल दुकानेरस्ता दुरुस्तीरस्त्याची दुरवस्थारस्त्यावर मोठा खड्डावाळू वाहतूकवाहनधारकांची गैरसोयशालेय विद्यार्थ्यांची कसरत
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article पालकमंत्री मकरंद पाटील १३ ते १५ ऑगस्टदरम्यान बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर
Next Article बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचा वंजारी समाज बांधवांकडून सत्कार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up