आषाढी एकादशीनिमित्त २५ जुलै रोजी श्री गजानन महाराज संस्थानतर्फे भव्य दिंडी सोहळा
बुलढाणा (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त श्री गजानन महाराज संस्थान, गोडबोले लेआऊट, जांभरून रोड, बुलढाणा यांच्या वतीने शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या परमार्थिक सोहळ्यात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात येणार असून, सकाळी १० वाजता दिंडीचे प्रस्थान होणार आहे. तसेच सकाळी १० वाजल्यापासून भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात येणार आहे.या दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांनी वारकरी पोशाखात उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे. श्री गजानन महाराज संस्थानतर्फे आयोजित या धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“विद्यार्थ्यांचा आवाज दडपणारी सत्ता टिकणार नाही” : विश्वदीप पडोळ
विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ २३ जुलैला बुलढाण्यात मूक रॅली
सामाजिक उपक्रमांनी शिवाजीराव बापू देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
