By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > राजकीय > खासगी वाटाघाटीने जमीन देणाऱ्यांनाही प्रकल्पग्रस्त दर्जा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
राजकीयरोजगाराच्या वाटाविविधसमोरच्या बाकावरुन

खासगी वाटाघाटीने जमीन देणाऱ्यांनाही प्रकल्पग्रस्त दर्जा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Team Batmivishwa
Last updated: August 5, 2026 1:11 pm
By Team Batmivishwa
Published: August 5, 2026
राजकीय रोजगाराच्या वाटा विविध समोरच्या बाकावरुन
76 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, दि. ५ : राज्यातील सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटीद्वारे (थेट खरेदी) स्वेच्छेने जमीन उपलब्ध करून दिलेल्या भूमीधारकांना आणि त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील आणि राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी हा निर्णय जाहीर केला असून, यामुळे हजारो भूमीधारकांना शासनाच्या विविध सवलती व पुनर्वसन योजनांचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी केवळ भूसंपादन कायद्यानुसार संपादित झालेल्या जमिनींच्या मालकांनाच प्रकल्पग्रस्त म्हणून विविध लाभ मिळत होते. मात्र, सार्वजनिक प्रकल्पांना गती मिळावी म्हणून अनेक शेतकरी व भूमीधारकांनी खासगी वाटाघाटीद्वारे जमीन दिली असतानाही त्यांना प्रकल्पग्रस्ताचा दर्जा मिळत नव्हता. त्यामुळे या भूमीधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या संदर्भात विविध लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त संघटना आणि शेतकरी यांनी शासनाकडे सातत्याने मागणी केली होती. त्यानुसार २० जुलै २०२६ रोजी मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्त संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. या बैठकीत खासगी वाटाघाटीद्वारे जमीन देणाऱ्यांनाही प्रकल्पग्रस्त दर्जा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत शासनाने अवघ्या दोन आठवड्यांत शासन निर्णय (जीआर) जारी करत खासगी वाटाघाटीद्वारे सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन दिलेल्या भूमीधारकांनाही प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे संबंधित भूमीधारक व त्यांच्या वारसांना शासनाच्या प्रकल्पग्रस्त धोरणांतर्गत उपलब्ध असलेले विविध लाभ, सवलती आणि पुनर्वसनाशी संबंधित सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले की, या निर्णयामुळे सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या भूमीधारकांना न्याय मिळेल तसेच शासन आणि नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ होईल. भविष्यात सार्वजनिक विकास प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेलाही यामुळे गती मिळेल. राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, खासगी वाटाघाटीद्वारे सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन दिलेल्या शेतकरी व भूमीधारकांना तसेच त्यांच्या वारसांना आता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे ते शासकीय नोकरीतील प्रकल्पग्रस्त आरक्षण तसेच शैक्षणिक प्रवेशातील राखीव जागांसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत.

पदाधिकाऱ्यांनी जनसामान्यांचा विश्वास संपादन करावा; नरेश शेळके यांचे आवाहन

परिचारिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी बुलढाण्यात दोन तास कामबंद आंदोलन

You Might Also Like

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारवाढीसोबत किती एरिअर्स मिळणार? जाणून घ्या मोठी अपडेट
Buldhana : विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकले; येणारा काळ उद्धव ठाकरेंचा – जालिंदर बुधवत
तीन शिक्षिका लेकींकडून वृद्ध वडिलांची उपेक्षा; अंत्यसंस्कारासाठीही फक्त ऑनलाइन ५,१०० रुपये!
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या विचारांवर वकील बांधवांचा विश्वास
18 Top Fall Fashion Trends from New York Fashion
TAGGED:आशिष जयस्वालखासगी वाटाघाटी जमीनजमीन संपादनथेट खरेदी जमीनप्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रप्रकल्पग्रस्त लाभमकरंद जाधव पाटीलमहाराष्ट्र जीआर 2026महाराष्ट्र शासन निर्णयराज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालसार्वजनिक प्रकल्प
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article पात्र कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्या; कामगार मंत्री आकाश फुंडकरांचे निर्देश
Next Article पतसंस्थेविरोधात सहकार विभागाचा दणका; ठेवीदारांचे पैसे तातडीने परत करण्याचे आदेश
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up