राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) बुलढाणा जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची प्रथम बैठक उत्साहात
बुलढाणा, दि. ४ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) बुलढाणा जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची प्रथम बैठक राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करावे. तसेच सर्वसामान्य आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांवर काम करून जनतेचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी केले.बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील, जिल्हा पक्ष निरीक्षक पंकज नाना बोराडे (दक्षिण), प्रा. विश्वनाथ कांबळे (उत्तर) यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नुकतीच विदर्भ प्रभारी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सूचनेनुसार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने बुलढाणा जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, तिची ही पहिली बैठक होती.
प्रास्ताविकात प्रदेश उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत पक्ष विस्तारासाठी आवश्यक सूचना केल्या. जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकाऱ्याने गावपातळीपर्यंत संघटन बळकट करण्याचे आवाहन केले. आघाडीत सन्मानजनक स्थान मिळाले तर उत्तम, अन्यथा स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पक्ष निरीक्षक पंकज नाना बोराडे, प्रा. विश्वनाथ कांबळे तसेच माजी जिल्हाध्यक्ष साहेबराव सरदार यांनीही पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन केले. बैठकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी मांडला असून, जिल्हा उपाध्यक्ष पी. एम. जाधव यांनी त्यास अनुमोदन दिले.तसेच राम राठोड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या बैठकीस माजी आमदार नानाभाऊ कोकरे, प्रदेश सरचिटणीस संतोषराव रायपुरे, बी. टी. जाधव, प्रदेश सचिव अफ्ताफ खान, प्रदेश सदस्य तात्या कृपा, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रिजवान खान यांच्यासह रियाज खान, ज्योती खेडेकर, अभय चव्हाण, दिनकरराव देशमुख, गंगाधर जाधव, सौरभ तायडे, आत्माराम कायंदे, वर्षा इंगळे, वर्षा वाघ, नाझीमा खान, मधुकर गव्हाड, सईद इकबाल, प्रशांत डोंगरदिवे, गणपत कुसळकर, अमोल भट, आशिष वायझोडे, किशोर मापारी, गजानन वायाळ, अनिल वर्मा, कबीर भाई यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रवक्ते अजीम नवाज राही यांनी केले.
राज्यस्तरीय ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने प्रा. राजेश्वर सुसर यांचा गौरव
परिचारिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी बुलढाण्यात दोन तास कामबंद आंदोलन
