नांदुरा रेल्वेस्टेशनचे ७५ वे अमृत स्थानकाचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती
प्रवीण थोरात/ बुलढाणा
वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय वामन सावकारे हे शुक्रवार दि. १७ जुलै २०२६ रोजी नांदुरा जि. बुलढाणा दौर्यावर येत आहे. तसेच जिगाव धरण प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी येणार आहे.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार शुक्रवार दि. १७ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता भुसावळ येथून नांदुरा जि. बुलढाणा येथे आगमन व जिगाव धरण प्रकल्पाकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता जिगाव धरण प्रकल्प येथे आगमन व प्रकल्पाची पाहणी. दुपारी १२.३० वा. जिगाव धरण प्रकल्प येथुन शासकीय विश्रामगृह नांदुराकडे प्रयाण व दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह नांदुरा येथे भाजपा पदाधिकारी व आमदार चैनसुखी संचेती यांच्यासोबत विविध विषयावर बैठक. दुपारी १.३० वा. शासकीय विश्रामगृह येथून रेल्वेस्टेशनकडे प्रयाण. दुपारी २ वाजता नांदुरा रेल्वेस्टेशनचे ७५ वे अमृत स्थानकाचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी २.३० वाजता नांदुरा रेल्वेस्टेशन येथून भुसावळकडे प्रयाण करतील.
बुलडाणा अर्बनच्या पिंपळगाव राजा शाखेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात
NEET-UG 2026 चा निकाल जाहीर; 11.21 लाख विद्यार्थी पात्र, मुलींची पुन्हा सरशी
मलकापुरात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून तीन बालकामगारांची मुक्तता
मा.आ.एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अनुभव व छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन
