By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > उत्तर महाराष्ट्र > ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपयांचे मानधन देण्यात येणार
उत्तर महाराष्ट्रधार्मिकमहाराष्ट्ररोजगाराच्या वाटासांस्कृतिकसिंदखेडराजा

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपयांचे मानधन देण्यात येणार

Team Batmivishwa
Last updated: July 9, 2026 9:17 pm
By Team Batmivishwa
Published: July 9, 2026
उत्तर महाराष्ट्र धार्मिक महाराष्ट्र रोजगाराच्या वाटा सांस्कृतिक सिंदखेडराजा
119 Views
3 Min Read
Share
3 Min Read
SHARE

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना
३१ जुलै पर्यंत आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत- सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन

ही योजना सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांच्या कलासाधनेचा सन्मान करून त्यांना सामाजिक व आर्थिक बळ मिळावे, यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग विविध कल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवत आहे. पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी अर्जाची अंतिम मुदत लक्षात घेऊन ३१ जुलै २०२६ पूर्वी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

बुलढाणा (प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांना अनुसरून आयुष्यभर कला व साहित्य क्षेत्रात योगदान देणार्‍या ज्येष्ठ कलावंतांना आर्थिक आधार आणि सन्मान मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. कला व साहित्य क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाचा गौरव करून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्य करणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने राबविण्यात येणार्‍या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना Rajarshi Shahu Maharaj Senior Litterateur and Artist Honor Scheme अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणार्‍या राज्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

दिव्यांग कलाकारांसाठी दहा वर्षांची शिथिलता

योजनेसाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली असून त्यांच्यासाठी किमान वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अर्जदाराचे कला अथवा साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षांचे योगदान असणे आवश्यक असून वयाने ज्येष्ठ असलेल्या विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

काय आहे अटी?

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. तसेच ज्यांची उपजीविका प्रामुख्याने कला क्षेत्रावर अवलंबून असून अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही, अशाच पात्र साहित्यिक व कलाकारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या नियमित मासिक पेन्शन अथवा कोणत्याही महामंडळाच्या निवृत्तीवेतनाचा लाभ घेणारे अर्जदार या योजनेसाठी अपात्र राहतील. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

आवश्यक लागणारी कागदपत्रे

ऑनलाइन अर्ज करताना वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचे संयुक्त छायाचित्र (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास), राज्य अथवा केंद्र शासनाचे संबंधित प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था किंवा व्यक्तींचे शिफारसपत्र (लागू असल्यास) तसेच आवश्यक अन्य कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

 

चांगेफळचा प्रथमेश ठरला देशातील अव्वल गुणवंत; सीए फाउंडेशनमध्ये भारतात १६वा क्रमांक!

जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्या प्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

You Might Also Like

स्त्री रुग्णालयात फायर सिस्टीमची तांत्रिक तपासणी
महाराष्ट्र दिनी अल्पवयीन मुलीस पळवून आणले; गुन्हा दाखल
वन विभाग संदर्भातील समस्या सोडविण्याकरिता नागरिकांनी जनता दरबारात सहभागी व्हावेः जिल्हाध्यक्ष मा. आ. विजयराज शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बुलडाण्यात
पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा यात्रेत आज पेटणार नारळाची होळी
TAGGED:००० रुपयांचे मानधन देण्यात येणार000.Rajarshi Shahu Maharaj Senior Litterateur and Artist Honor SchemeSenior litterateurs and artists will be given a monthly honorarium of ₹5ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजनासांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article चांगेफळचा प्रथमेश ठरला देशातील अव्वल गुणवंत; सीए फाउंडेशनमध्ये भारतात १६वा क्रमांक!
Next Article प्रा.डॉ.राहूल इंगळे यांना इंग्रजी विषयात आचार्य. (P.hd) पदवी जाहिर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up