वाट ही चालत राहिलो
जिकडे मिळेल तिकडे
आयुष्य असंच काढत राहिलो
आयुष्यात खरं बोलत राहिलो .. १
पराभव नेहमी पचवित आलो
रणांगणात नेहमी लढत आलो
पराभवाने कधीच खचलो नाही
विजयाने कधीच आनंदलो नाही .. २
माझ्या सोबत कुणीच नव्हते
एकटाच वाट ही चालत राहिलो
संकटाना दोन हात करत आलो
वादळांशी भिडत नेहमी राहिलो .. ३
दोष माझा होता की त्यांचा
तरी शिक्षा मी भोगत राहिलो
आयुष्यात लाचारीने जगलो नाही
स्वभिमानाने नेहमी लढत राहिलो . ४
छाती ठोकून सांगत राहिलो
नेहमी संयमानेच वागत राहिलो
नेहमी सर्वां सोबत हसत राहिलो
किती तरी मनात दुःख ठेविलो .. ५
प्रा पी एस बनसोडे सर
साहित्यिक, लातूर 8390363265, 9604354148
Breaking News पाडळी गावात बिबट्याचा धुमाकूळ; पाच बकऱ्यांचा बळी
