A grand blood donation camp will be organized at Sindkhedraja tomorrow.
सिंदखेडराजा
निमा (NIMA)म्हणजेच नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन तसेच नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अँड ऍक्टिव्हिस्ट (NIFAA) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर शहीद दिनाचे औचित्य साधून दि 23 मार्च 2025 ला भव्य रक्तदान शिबीरांचे आयोजन सिंदखेडराजा येथे करण्यात आले आहे
ज्या वीरांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हसतहसत आपल्या प्राणांचे बलिदान दिले, ते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ म्हणजेच शहीददिनाला 23 मार्च, रविवारी आपण निमा सिंदखेडराजा शाखा, आणि न्यू मातृतीर्थ प्रतिष्ठान,सिंदखेडराजा यांच्यातर्फे ऐतिहासिक मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत सावता भवन, नगरपरिषद येथे,दि. 23 मार्च रोजी रविवारी सकाळी 8.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत रक्तसंकलन जनकल्याण रक्तपेढी जालना यांच्या वतीने मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी या शिबिरात रक्तदान करून तसेच आपल्या नातेवाईक मित्रपरिवार तसेच सहकाऱ्यांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित करून हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे व शहीदांना खरी आदरांजली वाहावी असे विनंतीवजा आवाहन करण्यात आले आहे,, तरी रक्तदात्यानी
1) डॉ. ज्ञानेश्वर पातुरकर 7720081859
2) डॉ.विलास खुरपे 9850499359
3)डॉ. प्रशांत खरात 9970255570
यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी व सदस्य निमा शाखा सिंदखेडराजा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
