By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > योगासनाला एशियन गेम्स, ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार : आमदार संजय गायकवाड
बुलडाणाबुलडाणा जिल्हासमोरच्या बाकावरुन

योगासनाला एशियन गेम्स, ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार : आमदार संजय गायकवाड

Team Batmivishwa
Last updated: September 11, 2026 11:03 pm
By Team Batmivishwa
Published: September 11, 2026
बुलडाणा बुलडाणा जिल्हा समोरच्या बाकावरुन
59 Views
3 Min Read
Share
3 Min Read
SHARE

बुलढाणा  : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, बुलढाणा जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि सहकार विद्या मंदिर, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ व्या सिनीयर महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धा-२०२६ चे गुरुवारी बुलढाणा येथे उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात उद्घाटन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातील गुणवंत योगासनपटूंना आपले कौशल्य सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

Contents
जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा दबदबायोगासनातून निरोगी समाजाची निर्मितीयोगगीत, नृत्य आणि रिदमिक योगाने रंगत

युवा पिढीमध्ये योग, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक एकाग्रता, शिस्त आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार होणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील युवा खेळाडूंना अशा स्पर्धांच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी मिळते, असे मत उद्घाटनप्रसंगी आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.

योगासन या क्रीडा प्रकाराला भविष्यात एशियन गेम्स तसेच ऑलिम्पिकमध्ये अधिकृत स्थान मिळावे, यासाठी आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित करून शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार गायकवाड यांनी सांगितले. महाराष्ट्रातील गुणवंत योगासनपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक संधी मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा दबदबा

स्पर्धेच्या प्रास्ताविकात डॉ. संजय मालपाणी यांनी योगासन क्षेत्रातील महाराष्ट्राच्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली. गेल्या सात वर्षांपासून योगासन या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने जागतिक पातळीवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेल्या ११४ पदकांपैकी तब्बल ४० पदके महाराष्ट्रातील खेळाडूंनी पटकावली असून, हा वाटा सुमारे ४० टक्के आहे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय खेळ, खेलो इंडिया युथ गेम्स आणि युनिव्हर्सिटी गेम्स यांसारख्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या पदकतालिकेत योगासनाचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही योगासन खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्रात योगासनाची भक्कम पायाभरणी करण्यामध्ये बृहन्महाराष्ट्र योग परिषद, अमरावतीचे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि डॉ. अरुण खोडस्कर यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे डॉ. मालपाणी यांनी सांगितले.

योगासनातून निरोगी समाजाची निर्मिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना राधेश्यामजी चांडक यांनी योगासनाचे आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित केले. अनेक आजारांवर औषधोपचार प्रभावी असले तरी शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योगासनांना पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले.

योगाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन करताना, योगप्रचार हे केवळ वैयक्तिक कार्य नसून समाजजीवन, आध्यात्मिक जीवन आणि समाजाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे कार्य असल्याचे चांडक यांनी नमूद केले. सहकार विद्या मंदिरमध्ये या पवित्र कार्याचे आयोजन झाल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

योगगीत, नृत्य आणि रिदमिक योगाने रंगत

उद्घाटन कार्यक्रमाला सहकार विद्या मंदिरच्या अध्यक्ष कोमलताई झंवर (चांडक), राज्याचे टेक्निकल डायरेक्टर सतीश मोहगावकर, राज्य संघटनेचे सचिव राजेश पवार, जिल्हा योगासन असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम उपरवट, स्पर्धाप्रमुख संजय देशमुख आणि सहकार विद्या मंदिरचे प्राचार्य अलगर सामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैशाली निकम आणि क्षितीज निकम यांनी केले. सुरुवातीला शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू नितीन पवळे यांनी खेळाडूंना शपथ दिली. सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी योगगीत व नृत्य सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच संतुलन योगवर्गातील बाल योगसाधकांनी सादर केलेल्या रिदमिक योगाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सदाव्रते आणि दीपक वाघ यांनी केले. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव राजेश पवार यांनी आभार मानले. यावेळी राज्यभरातून आलेले योगासनपटू, क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर वाळलेली सोयाबीन

अतुल सावे यांच्या कुटुंबावरच हल्ला; बिडकीनमध्ये रस्त्याच्या वादातून खळबळ!

सुरेशकुमार वैराळकर यांचा भव्य सत्कार; बुलढाण्यात रंगणार गझल मुशायरा

You Might Also Like

शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यात यावा- आशा व गट प्रवर्तकांची मागणी
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
महाराष्ट्रातील दहा मान्यवर कलावंतांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने राष्ट्रीय सन्मान
८६ हजार एसटी कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गोड बातमी
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात मूक रॅली; राष्ट्रपतींना निवेदन
TAGGED:5 Percent Job Reservation for Yogasana PlayersBuldhana District Yogasana Sports AssociationBuldhana Latest NewsBuldhana Sports NewsBuldhana Yoga Asana CompetitionHealthy Lifestyle Through YogaMaharashtra Latest NewsMaharashtra Sports NewsMaharashtra State Yoga Asana ChampionshipMaharashtra Yogasana PlayersMaharashtra Yogasana Sports AssociationMLA Sanjay GaikwadSahakar Vidya Mandir BuldhanaSanjay GaikwadState Level Yogasana CompetitionYoga and FitnessYoga Asana Competition 2026Yoga for Mental FocusYoga Sports NewsYogasana Asian GamesYogasana MaharashtraYogasana OlympicsYogasana PlayersYogasana Sports
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article अतुल सावे यांच्या कुटुंबावरच हल्ला; बिडकीनमध्ये रस्त्याच्या वादातून खळबळ!
Next Article शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर वाळलेली सोयाबीन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
शिवस्मारक समितीची धुरा आमदार संजय गायकवाडांकडे; सचिवपदी अनिल म्हस्के यांची निवड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा राजकीय
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up