Government employee status should be given – demand of ASHA and group promoters
आशा व गट प्रवर्तकांच्या आंदोलनास भा.रा.कॉ व शिवसेना (उ.बा.ठा) चा पाठींबा
बातमीविश्व टिम मलकापुर
आशा व गट प्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने मंगळवार, दि.२० मे २०२५ रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) संलग्न आशा व गट प्रवर्तक संघटना जि.बुलढाणा शाखा मलकापूरच्या वतीने उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसरात तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.
आंदोलना प्रसंगी आशा व गट प्रवर्तकांच्या फिरती भत्ता प्रतिदिन ५० रू. करण्यात यावा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा, शहरी भागातील सर्व आशांना महिला समिती मंजूर करून द्यावी, आशा व गट प्रवर्तकांना दर महिन्याला वेतन स्लिप देण्यात यावी, शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देण्यात यावा, किमान वेतन २६ हजार व सेवानिवृत्त १० हजार रू. पेन्शन लागू करण्यात यावी अशा २० प्रमुख मागण्यांकरीता आज प्रवर्तक संघटनेच्या अध्यक्ष पंजाबराव गायकवाड, सचिव जयश्री तायडे, ललिता बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर तालुका आशा व गट प्रवर्तक संघटना यांच्या वतीने सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी भा.रा.कॉ चे माजी नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ, शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख गजानन ठोसर, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास यांनी या आंदोलनाला भेट देवून पाठींबा दर्शविला.
या आंदोलनात सीटू संघटनेचे अर्चना मोरे, कविता वाघ, छाया धोरण, सौ.भारती भारसाकळे, अनुराधा डिवरे, स्वाती संबारे, सुमन सोनोने, सौ.शितल राजपूत, मनिषा पवार, पुजा फिरके, रेखा कोलते, सुनिता भोंबे, सौ.वनिता वराडे, सौ.कल्पना भोळे, छाया केने, जयश्री जैस्वाल, हुमेरा खानम शेख फरहान, किर्ती पाटील, फरजानाबी रहेमान खान, मनिषा सरोदे, सौ.मंगला चव्हाण यांचेसह बहुसंख्य आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या महिला सहभागी झाल्या होत्या.
