बातमीविश्व
मेहकर उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मंगळवार, दि.४ मार्च २०२५ च्या आदेशान्वये डोणगाव पोलीस स्टेशन यांनी शनिवार, दि.८ मार्च रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांना कायदेशीरपणे तडीपारी करुन हिंगोली जिल्ह्यामधील गोरेगाव पोलीस स्टेशन येथे नेऊन सोडले होते. विधीतज्ञ व्हि.डि.नरवाडे यांनी अपिलार्थीच्या वतीने भक्कम बाजू मांडली. यावरुन डॉ.ज्ञानेश्वर टाले यांना दर सोमवार सकाळी ११ वाजता हजेरी द्यावी लागेल तसेच सदर प्रकरण अंतिम आदेश होईपर्यंत कोणत्याही राजकीय धार्मिक व सार्वजनिक उपक्रमात सहभागी होऊ नये धरणे आंदोलन भाग घेऊ नये अशी ताकीद दिली आहे.

डॉ. ज्ञानेश्वर टाले यांचे विधीतज्ञ व्हि.डि.नरवाडे यांनी अपिलार्थीच्यावतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ६० अन्वये मा. विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सदर आदेशाविरुद्ध गुरुवार, दि.६ मार्च रोजीच अपील केली होती. त्या अपीललावर मा.आयुक्त यांच्याकडे अॅड.व्हि.डी.नरवाडे यांनी जोरदार युक्तिवाद करत ज्ञानेश्वर टाले यांची बाजू मांडली व विविध प्रकरणातील दाखले व न्याय निवाडे सादर केले. अखेर शनिवार, दि.८ मार्च २०२५ रात्री उशिरापर्यंत सदर स्थगनआदेश हाती मिळाला. मु.पो. का.१९५१/हद्दपार/इएसटी/ कपिल/क्रं.०२/२०२५ बुलडाणा. विभागीय आयुक्त अमरावती यांचे कार्यालय. सदर आदेशाच्या प्रती उपविभागी दंडाधिकारी तालुका मेहकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन डोणगाव पोलीस उपाधीक्षक मेहकर यांच्या केलेल्या असून, आदेशामध्ये विविध अटी शर्ती घालून अपील अर्थी यांना पोलीस स्टेशन तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे दर सोमवार सकाळी ११ वाजता हजेरी द्यावी व सदर प्रकरण अंतिम आदेश होईपर्यंत कोणत्याही राजकीय धार्मिक व सार्वजनिक उपक्रमात सहभागी होऊ नये धरणे आंदोलन भाग घेऊ नये अशी ताकीद दिली आहे.
या विधीतज्ञांनी मांडली बाजू…
या प्रकरणांध्ये अॅड.व्हि.डी.नरवाडे यांनी व्यक्तिवाद करत बाजू मांडली व अॅड.मनोज नरवाडे, अॅड.पवन गवई, अॅड.जीवन जाधव, अॅड.गणेश जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.
