By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > खुर्ची आणि संगणकानंतर आता वाहन जप्त
बुलडाणाबुलडाणा जिल्हामलकापूरसमोरच्या बाकावरुन

खुर्ची आणि संगणकानंतर आता वाहन जप्त

Team Batmivishwa
Last updated: August 18, 2026 12:13 am
By Team Batmivishwa
Published: August 18, 2026
बुलडाणा बुलडाणा जिल्हा मलकापूर समोरच्या बाकावरुन
111 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

बुलढाणा : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्यायालयाने आदेश देऊनही त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यास दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने बुलढाणा जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मुंढे यांचे शासकीय वाहन सोमवारी सायंकाळी जप्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची खुर्ची आणि संगणक जप्त करण्यात आल्यानंतर आता थेट शासकीय वाहनावर जप्तीची कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

२००९ पासून मोबदल्यासाठी संघर्ष

मोताळा तालुक्यातील गोतमारा-कोऱ्हाळा शिवारात २००९ मध्ये पाझर तलाव उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, जमीन संपादन होऊनही संबंधित शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळाला नाही. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी मलकापूर दिवाणी न्यायालयात दाद मागितली.

५ लाख ५८ हजारांचा मोबदला अद्याप प्रलंबित

या प्रकरणात दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर २०२३ मध्ये न्यायालयाने संबंधित शेतकऱ्यांना ५ लाख ५८ हजार १० रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी, लघु सिंचन विभागाचे अधिकारी तसेच विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी संबंधित या प्रकरणात आदेश होऊनही मोबदला देण्यास प्रशासनाकडून विलंब होत राहिला.

मोबदला मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर न्यायालयाने आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या प्रशासनाविरोधात कठोर भूमिका घेतली.

खुर्ची आणि संगणकानंतर आता वाहन जप्त

या प्रकरणात प्रशासनाविरोधात झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी १६ जून रोजी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांची खुर्ची आणि दोन संगणक संच जप्त करण्यात आले होते. त्यानंतरही मोबदल्याचा प्रश्न मार्गी न लागल्याने सोमवारी बाधित शेतकरी, त्यांचे वकील अॅड. विनोद बावस्कर आणि न्यायालयाचे कर्मचारी जलसंधारण अधिकारी कार्यालयात पोहोचले.

न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळाला आहे.

दरम्यान, २००९ पासून आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नसल्याने प्रशासनाने तातडीने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

पुण्यातील मिठाई दुकानाचा परवाना निलंबित केल्याने FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड

‘एकला चलो’चा नारा; शेतकरी हितासाठी सत्तेपासून दूर राहण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

भाजपची ‘नवीन’ टीम जाहीर; स्मृती इराणी महामंत्री, वसुंधरा राजे राष्ट्रीय उपाध्यक्ष

You Might Also Like

शिवसेना (उबाठा) पक्षाचा ८ ऑगस्ट रोजी खामगावात भव्य कार्यकर्ता मेळावा
मलकापूर बसस्थानकात मद्यधुंद इसमाचा धुडगूस; पाच एसटी बसच्या काचा फोडल्या
बापरे.. १६ हजार ६६७ ग्रामीण विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व स्टडी टेबल
अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, तुपकरांच्या आंदोलनाचा मुंबईत भडका
महाराष्ट्र दिनी युवराज करणार उपोषण
TAGGED:Amol MundheBuldhana NewsCourt ActionFarmer CompensationGovernment Vehicle SeizedIrrigation ProjectLand Acquisition CompensationMaharashtra NewsMalkapur CourtMotala TalukaProject Affected FarmersWater Conservation Departmentअमोल मुंढेकोऱ्हाळागोतमारागोतमारा कोऱ्हाळा पाझर तलावजलसंधारण अधिकारी वाहन जप्तजलसंधारण विभागन्यायालयाचा दणकान्यायालयीन कारवाईपाझर तलावप्रकल्पग्रस्त शेतकरीबुलढाणाबुलढाणा बातम्याभूसंपादनभूसंपादन मोबदलामलकापूर न्यायालयमोताळावाहन जप्तशेतकरी न्यायशेतकरी मोबदलासरकारी निष्काळजीपणा
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article पुण्यातील मिठाई दुकानाचा परवाना निलंबित केल्याने FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
Next Article संतनगरी सज्ज : श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे बुधवारी शेगावात आगमन 
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up