बुलढाणा- शिवजन्मभूमी जुन्नर-शिवनेरी येथून आलेल्या शेतकरी बांधवांनी आंदोलनस्थळी भेट देत रविकांत तुपकर यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीची पवित्र माती आणून तुपकर यांच्या कपाळी लावली. तसेच शेतकरी चळवळीचे प्रतीक असलेला आसूड भेट देत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा संदेश दिला. शिवनेरीच्या मातीचा आशीर्वाद आणि शेतकरी बांधवांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. ही माती स्वाभिमान, संघर्ष आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते, अशी प्रतिक्रीया रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस उजाडला आहे. चवथ्या दिवस राज्यभरातील उग्र निदर्शने, संतप्त प्रतिक्रिया आणि नाट्यमय घटनांनी गाजायला सुरुवात झाली आहे. या करिता मंत्रालय परिसरातील एका झाडांवर आंदोलकाने गळ्यात फास लावून झाडांवर फटाके फोडून अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देवून प्रशासनाला वेठीस धरण्यात येत आहे.
कर्जमुक्ती, पीकविमा आदी मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून तुपकरांची तब्येत खालावली आहे. दरम्यान तुपकर यांची प्रकृती खालावत चालल्याने शेतकरी आंदोलक आक्रमक होत आहेत. राज्यभरात आंदोलन होत असतानाच मुंबईतही त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून जलसमाधी आंदोलन केले जात आहे. तुपकर यांना सपोर्ट करण्यासाठी मुंबईतही त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी जलसमाधी आंदोलन करत आहेत. भरसमुद्रात कार्यकर्ते, पदाधिकारी उतरले असून मोठे थरारक वातावरण निर्माण झाले.
मुंबईतील अरबी समुद्रत अर्थात गेट वे ऑफ इंडिया येथे तुपकरांच्या समर्थकांनी, पदाधिकार्यांनी उड्या मारल्या आहेत. सरकारने कर्जमाफीची योजना लागू केली, मात्र ती फसवी योजना आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तुपकरांच्या आंदोलनला सपोर्ट करत त्यांचे अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल होत त्यांनी समुद्राकडे धाव घेतली. काही लातूरवरून आले, काहींनी समुद्राच्या पाण्यात उडी घेतली. मोदी सरकार हाय हाय असं म्हणत त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील सुरू केली आहे. तर आता नुकत्याच आलेल्या अपडेट वरुन मंत्रालय परिसरात ल झाडावर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे.

दुसर्या रात्रीच आंदोलनाचा उद्रेक; किनगाव जट्टूत एसटी बस जळाली

दुसर्या रात्रीच आंदोलनाचा उद्रेक; किनगाव जट्टूत एसटी बस जळाली
आंदोलनाच्या दुसर्या रात्री लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे एसटी बस जळाल्याची घटना घडली. पोलिस प्रशासनाकडून बस शॉर्टसर्किटमुळे पेटल्याचा दावा केला जात असला तरी ती बस आंदोलकांनीच पेटवली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन सतर्क झाले आहे.
पेठ पुलावर मध्यरात्री टायर जाळून निषेध
चिखली-खामगाव मार्गावरील पेठ येथील पुलावर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात आंदोलकांनी टायर पेटवून आंदोलन केले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शेतकर्यांच्या कर्जमुक्तीच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
खामगावात एसडीओ कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
मध्यरात्री खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरसकट कर्जमुक्ती करा, शेतकर्यांना न्याय द्या अशा आशयाचे फलक झळकवत शासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
जळगाव जामोदमध्ये तहसील कार्यालयावर चढले शेतकरी
तिसर्या दिवशी आंदोलनाला आणखी आक्रमक स्वरूप प्राप्त झाले. जळगाव जामोद येथे अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले. हातात फलक घेऊन शेकडो शेतकर्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.अचानक उभारलेल्या या आंदोलनामुळे पोलीस आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
उदयनगरात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
चिखली तालुक्यातील उदयनगर येथे शेतकरी आंदोलकांनी थेट पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. कर्जमुक्ती आणि पीकविम्याच्या मागण्यांसाठी आंदोलकांनी टाकीवरून घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले.
शेतकर्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अॅड. शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले होते.
जिल्हाधिकार्यांना सातबार्याचे वाण देण्यासाठी अॅड .शर्वरी तुपकर शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अडवण्यात आलेल्या आंदोलकांनी संतप्त होत दूध, कांदे, टोमॅटो आणि विविध भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळातच संपूर्ण परिसर भाजीपाल्याने भरून गेला. याच दरम्यान अंत्री खेडेकर येथील विठ्ठल खेडेकर या तरुण शेतकर्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला वेळीच ताब्यात घेतले आणि आगपेटी जप्त केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
चर्चा झाली… पण तोडगा नाही!
दरम्यान, शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार कुमरे, ठाणेदार संग्राम पाटील तसेच सहकार विभागाच्या अधिकार्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तुपकर यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेत शेतकर्यांच्या कोणत्याही प्रमुख मागणीवर ठोस निर्णय होऊ शकला नाही. यावेळी तुपकर यांनी अधिकार्यांसमोर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ङ्घङ्घकेवळ चर्चा करून वेळकाढूपणा करण्याचा आणि आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न शासनाने करू नये. शेतकरी आता आश्वासनांचे डोस सहन करणार नाही. सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि इतर मागण्यांबाबत तातडीने शासन निर्णय काढावा,ङ्घङ्घ अशी मागणी त्यांनी केली. मला कोणत्याही प्रकारचा मान-सन्मान किंवा प्रसिद्धी नको. हा संघर्ष माझ्यासाठी नाही तर राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या हक्कांसाठी आहे. आता शब्द नकोत, निर्णय हवा; आश्वासने नकोत, न्याय हवा, असेही ते म्हणाले. सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तर त्याचे स्वागत केले जाईल; मात्र आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यव्यापी जनआंदोलन उभे राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यभरातून वाढता पाठिंबा; आंदोलनस्थळी विविध संघटनांची उपस्थिती
रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून शेतकरी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी बुलढाण्यात दाखल होत आहेत. आंदोलनस्थळी आंबेडकरी चळवळीचे नेते आशिष बाबा खरात, अखिल भारतीय किसान सभेचे प्रतिनिधी जितेंद्र चोपडे, सुनील चोपडे, कॉ. अनिल गायकवाड, माळेगाव परिसरातील शेतकरी, बुलढाणा जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, सुभाष करणतुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. शेतकरी, युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांच्या उपस्थितीमुळे आंदोलनस्थळी उत्साहाचे वातावरण असून संघर्षाला नवी ऊर्जा मिळत आहे.
निर्णयाशिवाय माघार नाही!
अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस संपत असतानाही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही. दुसरीकडे राज्यभरातून वाढणारा पाठिंबा, विविध भागांतील आक्रमक आंदोलने आणि बुलढाण्यातील आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार. निर्णयाशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.
सिद्धेश मुसळेचे जेईई परीक्षेत यश; ओबीसी कॅटेगिरीत ऑल इंडिया रँक ११५ क्रमांक
https://batmivishwa.in/3074/
