By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > उत्तर महाराष्ट्र > सिंहस्थपूर्वी कपिलधाराच्या विकासाला गती; १७ ऑगस्ट २०२७ रोजी पारंपरिक स्नान
उत्तर महाराष्ट्रधार्मिकराजकीयविविधसांस्कृतिक

सिंहस्थपूर्वी कपिलधाराच्या विकासाला गती; १७ ऑगस्ट २०२७ रोजी पारंपरिक स्नान

Team Batmivishwa
Last updated: July 28, 2026 1:33 pm
By Team Batmivishwa
Published: July 28, 2026
उत्तर महाराष्ट्र धार्मिक राजकीय विविध सांस्कृतिक
52 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

मंत्री छगन भुजबळांची घोषणा; सिंहस्थासाठी ₹११६ कोटींची विकासकामे सुरू, कपिलधाराचा अधिकृत नियोजनात समावेश करण्याची मागणी

नाशिक : पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र कपिलधाराच्या विकासाला गती देण्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. कावनई येथे झालेल्या गंगा-गोदावरी पूजन सोहळ्यात त्यांनी कपिलधारा हे सिंहस्थाशी ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याचे सांगत विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, असे स्पष्ट केले. याचवेळी वैष्णव आखाड्यांनी कपिलधारा येथील पारंपरिक स्नानाची तारीख १७ ऑगस्ट २०२७ अशी अधिकृतपणे जाहीर केली.

भुजबळ यांनी सांगितले की, मागील सिंहस्थानंतर परिसरात रस्ते, सिमेंट काँक्रीट रस्ते, तलाव विकास, रिंग रोड यांसारखी पायाभूत कामे करण्यात आली असून उर्वरित कामेही लवकरच पूर्ण केली जातील. आगामी सिंहस्थाच्या तयारीसाठी नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि जिल्ह्यात सुमारे ११६ कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत.

देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन रस्ते, वाहतूक, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छता, निवास व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांचे नियोजनबद्ध बळकटीकरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोदावरीसह सर्व जलस्रोत स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणावर विशेष भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी ग्रामपंचायत, तीर्थक्षेत्र विकास समिती आणि प्रशासनाच्या समन्वयातून तयार झालेल्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच सिंहस्थाच्या तयारीसाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, वैष्णव आखाड्यांच्या प्रतिनिधींनी श्रीक्षेत्र कपिलधारा येथील पारंपरिक स्नानाची तारीख १७ ऑगस्ट २०२७ अशी अधिकृतपणे जाहीर करत सिंहस्थ प्राधिकरणाच्या अधिकृत नियोजनात कपिलधारा तीर्थक्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली. संत-महंतांनी कपिलधारा हे प्राचीन व पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचे सांगत त्याच्या धार्मिक वारशाचे जतन आणि भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. महंत फलाहारी महाराज यांनीही या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, संत-महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरूडमध्ये भव्य आरोग्य शिबिर; ३५१ नागरिकांची मोफत तपासणी, गरजू रुग्णांच्या पुढील उपचारांचेही नियोजन

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांना ‘स्व. ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२६’ जाहीर; ‘वेचलेले मोती’ पुस्तकाचेही प्रकाशन

You Might Also Like

महाराष्ट्रातील सेवाभरती परीक्षांमध्ये मोठे बदल; उच्चस्तरीय समिती गठीत
तुकाराम मुंढेंचा एफडीएचा धडाका कायम!; आता विद्यापीठे आणि सरकारी महाविद्यालयांवर धाड
माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल
जिल्ह्यात ठिकठिकाणी सीटूच्या वतीने १ मे कामगार व महाराष्ट्र दिन साजरा
जनगणनेतील OBC कॉलमवर काँग्रेसचे मोठे अभियान; राहुल गांधींच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक
TAGGED:2027.Development of Kapildhara gains momentum ahead of Simhastha; traditional holy dip on August 17Minister Chhagan Bhujbal announces: Development works worth ₹116 crore for Simhastha are underway; demand raised to include Kapildhara in the official planning.कपिलधाराचा अधिकृत नियोजनात समावेश करण्याची मागणीमंत्री छगन भुजबळांची घोषणा; सिंहस्थासाठी ₹११६ कोटींची विकासकामे सुरूसिंहस्थपूर्वी कपिलधाराच्या विकासाला गती; १७ ऑगस्ट २०२७ रोजी पारंपरिक स्नान
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांना ‘स्व. ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२६’ जाहीर; ‘वेचलेले मोती’ पुस्तकाचेही प्रकाशन
Next Article Buldhana : उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपाइं (आठवले)चा बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up