अमरावतीतील संत गाडगेबाबा विद्यापीठ व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कँटीनची तपासणी
अमरावती : राज्यातील अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने कारवाईचा वेग वाढवला असून आता सरकारी आस्थापनांनंतर विद्यापीठे आणि महाविद्यालयांवरही धाडसत्र सुरू केले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शुक्रवारी अमरावतीतील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कँटीनची एफडीएच्या पथकाने तपासणी केली.
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या त्रुटींवर एफडीएला फटकारल्यानंतर विभागाने राज्यभर तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. विशेष म्हणजे, आजच मुंबईतील मंत्रालयाच्या कँटीनची तसेच विधिमंडळातील कँटीनची तपासणी करण्यात आली. त्यानंतर एफडीएने आपला मोर्चा शैक्षणिक संस्थांकडे वळवत अमरावतीत कारवाई केली.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी विद्यापीठे व महाविद्यालयांतील कँटीनची तपासणी, स्वच्छता, अन्नाचा दर्जा आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन याची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आवश्यक सूचना देण्यात आल्या असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही एफडीएने दिला आहे.
राज्यातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अन्न विक्री केंद्रांवर पुढील काळातही अशाच प्रकारच्या तपासण्या सुरू राहणार असल्याचे संकेत विभागाकडून देण्यात आले आहेत.
कोयना जलसागराचे नामांतर; आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’
‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ जिल्हास्तरीय स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणारात ठाकरे गटाला मोठे खिंडार?; युवासेनेतील सामूहिक राजीनाम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
