शेतकर्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार; रिपाई (आठवले) बुलढाणा जिल्ह्यात एकजुटीने सक्रिय
बुलढाणा- आमचे नेते नामदार डॉ. रामदासजी आठवले हे नेहमीच गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असतात. त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली आम्ही शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहोत. त्यांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पक्षात आता कोणताही वाद नसून आम्ही सर्वजण एकजुटीने काम करणार आहोत, असे प्रतिपादन रिपाईचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी केले. दरम्यान, मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रमेश अण्णा मुळे यांनीही रिपाई (आठवले) पक्षाचे संघटन मजबूत होत असल्याचे सांगत शेतकरी आणि वंचितांच्या प्रश्नांसाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे मैदानात उतरावे, असे आवाहन केले. दुष्काळाच्या संकटात शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत करण्याबरोबरच त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटित लढा उभारण्याचा निर्धार रिपाई (आठवले) पक्षाच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
दुष्काळात शेतकर्यांच्या बांधावर रिपाईचा एल्गार! हजारो कार्यकर्त्यांसह मैदानात उतरणार रमेश अण्णा मुळे
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांच्या मदतीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यात हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागातून शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. मुळे अण्णा फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू शेतकर्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारण्यात येणार असल्याची माहिती मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रमेश अण्णा मुळे यांनी दिली.
पक्षातील मतभेद मिटले; एकजुटीचे दर्शन
रिपाई (आठवले) पक्षात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेले किरकोळ गैरसमज आणि मतभेद आता दूर झाले आहेत. प्रदेश कार्यकारिणीतील बाबूराव दादा आणि जिल्हा संपर्कप्रमुख बाबासाहेब जाधव यांच्यातील वाद मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रमेश अण्णा मुळे यांनी मध्यस्थी करून सामंजस्याने मिटविल्याचे सांगण्यात आले.
या घडामोडींमुळे बुलढाणा जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक एकजुटीला बळ मिळाले असून, कार्यकर्ते मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे काम करण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे.
मनी लॉन्ड्रिंगच्या कारवाईची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न
