By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > विदर्भ > १८ हजार शेतकऱ्यांची केवायसी महिनाभरात पूर्ण करा; नव्याने पीक कर्ज देण्याच्या सूचना
राजकीयविदर्भसमोरच्या बाकावरुन

१८ हजार शेतकऱ्यांची केवायसी महिनाभरात पूर्ण करा; नव्याने पीक कर्ज देण्याच्या सूचना

Team Batmivishwa
Last updated: September 22, 2026 1:09 pm
By Team Batmivishwa
Published: September 22, 2026
राजकीय विदर्भ समोरच्या बाकावरुन
4 Views
3 Min Read
Share
3 Min Read
SHARE

अमरावती / जिमाका

Contents
अखंडित वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सुधाराजलसंधारणावर भर देण्याचे निर्देश

 जिल्ह्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत दोन टप्प्यांत ८६ हजार ४४७ शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली आहे. मात्र, मयत शेतकरी तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे सुमारे १८ हजार शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे. ही प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले.

नियोजन भवनात पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफी, पीक कर्ज आणि महावितरणच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून तलाठ्यांमार्फत संबंधितांना नोटिसा देण्याच्या सूचना केल्या. स्थानिक आमदारांनी या प्रक्रियेत स्वतः लक्ष घालून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधत महिनाभरात प्रकरणे निकाली काढावीत, असेही त्यांनी सांगितले.

मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तहसीलदारांकडून देण्यात येणारे वारसदार प्रमाणपत्र ग्राह्य धरून बँकांनी तातडीने कार्यवाही करावी. या कामात कोणतीही दिरंगाई किंवा कुचराई होऊ नये. संबंधित बँकांनी विलंब केल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.

अखंडित वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सुधारा

जिल्ह्यात शेती तसेच सार्वजनिक वापरासाठी वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने यंत्रणेत सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या ठिकाणी नवीन विद्युत रोहित्रांची आवश्यकता आहे, तेथे ती उभारण्यात यावी. त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

जलसंधारणावर भर देण्याचे निर्देश

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. मालगुजारी काळात गावोगावी बांधण्यात आलेल्या विहिरी पुनर्जीवित करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ठिकाणांची यादी तयार करावी. सिमेंट रस्त्यांपेक्षा जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देत भूजल पातळी वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तहसीलदारांशी संवाद साधून त्यांनी स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांची माहिती घेतली.

यावेळी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या ‘नशामुक्त अभियानां’तर्गत तयार करण्यात आलेल्या डॉक्युमेंटरीचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

बैठकीस खासदार बळवंत वानखडे, आमदार प्रवीण तायडे, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रतापदादा अडसड, प्रवीण पोटे, संजय खोडके, सुलभा खोडके, उमेश यावलकर, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

You Might Also Like

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार ) प्रदेश सरचिटणीस पदी बी.टी.जाधव यांची निवड
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा विशेष दिलासा
पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता दहीद बु. गावासाठी टँकर मंजूर
ग्रामपंचायतींसाठी मोठी भेट! ५ नव्या योजना, ९० लाखांपर्यंत निधी
२८ एप्रिल सेवा हक्क दिन महोत्सव लोकप्रतिनिधींना बोलावून साजरा करा
TAGGED:18000 Farmers KYCAhilyadevi Holkar Farmer Loan Waiver SchemeAmravati District NewsAmravati Farmer Loan WaiverAmravati FarmersAmravati NewsBawankule AmravatiChandrashekhar BawankuleCrop Loan MaharashtraElectricity for FarmersFarmer KYCFarmer Loan ReliefFarmer Loan Waiver MaharashtraFresh Crop LoansGroundwater LevelMaharashtra Agriculture NewsMaharashtra FarmersMSEDCLUninterrupted Power SupplyWater Conservation
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article राज्यात पुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
Next Article येलो मोझॅकच्या प्रादुर्भावासह पावसाअभावी पिके माना टाकू लागली
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up