By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > उत्तर महाराष्ट्र > एसटीच्या बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’; टोयोटा किर्लोस्करसह महामंडळाचा करार
उत्तर महाराष्ट्रधार्मिकबुलडाणा जिल्हाराजकीय

एसटीच्या बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’; टोयोटा किर्लोस्करसह महामंडळाचा करार

Team Batmivishwa
Last updated: September 16, 2026 1:31 pm
By Team Batmivishwa
Published: September 16, 2026
उत्तर महाराष्ट्र धार्मिक बुलडाणा जिल्हा राजकीय
18 Views
3 Min Read
Share
3 Min Read
SHARE

स्तनदा मातांसाठी सुरक्षित आणि खासगी जागा; तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने कक्ष उभारणार

मुंबई : महाराष्ट्रातील महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.

Contents
स्तनदा मातांसाठी सुरक्षित आणि खासगी जागा; तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने कक्ष उभारणारटोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर निधीतून प्रकल्पतीन वर्षांत १२५ कक्षजागा आणि मूलभूत सुविधांची जबाबदारी एसटीची‘हिरकणी कक्ष’मुळे मातांसाठी प्रवास अधिक सुलभ

महिला प्रवाशांना, विशेषतः स्तनदा मातांना, प्रवासादरम्यान बाळाची निगा राखण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. एसटीच्या बसस्थानकांवर मातृत्वाच्या गरजा लक्षात घेऊन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर निधीतून प्रकल्प

या प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत सहकार्य करणार आहे. सामंजस्य करारानुसार राज्यातील विविध एसटी बसस्थानकांवर अंदाजे ३ मीटर × ३ मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत.

या कक्षांमध्ये मातांना स्तनपान करण्यासह बाळाची निगा राखण्यासाठी सुरक्षित व खासगी जागा उपलब्ध असेल. आवश्यक फर्निचर, फिक्स्चर, अंतर्गत वायरिंग, विद्युतीकरण आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याचाही या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

तीन वर्षांत १२५ कक्ष

सामंजस्य करारानुसार तीन आर्थिक वर्षांत एकूण १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

  • २०२६-२७ : ५० कक्ष
  • २०२७-२८ : ५० कक्ष
  • २०२८-२९ : २५ कक्ष

सीएसआर धोरण, उपलब्ध जागा आणि स्थानिक गरजांचा विचार करून या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याची तरतूदही करारात करण्यात आली आहे.

जागा आणि मूलभूत सुविधांची जबाबदारी एसटीची

या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून सुमारे ५ मीटर × ५ मीटर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आवश्यक वीज, पाणी, स्थापनेसाठी सहकार्य आणि शासकीय परवानग्या मिळविण्याची जबाबदारी एसटीची राहणार आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कक्ष आणि त्यातील सुविधा महामंडळाकडे हस्तांतरित केल्या जातील. त्यानंतर कक्षांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती, देखभाल आणि देखरेखीची संपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळाची असेल.

विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून कोणतेही आर्थिक योगदान देण्यात येणार नाही. संपूर्ण प्रकल्प टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर उपक्रमातून राबविण्यात येणार आहे.

‘हिरकणी कक्ष’मुळे मातांसाठी प्रवास अधिक सुलभ

ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांना सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाची सेवा आहे. बसस्थानकांवर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध झाल्याने महिला प्रवाशांच्या गरजा अधिक संवेदनशीलपणे पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

‘हिरकणी कक्ष’ हा केवळ सुविधा प्रकल्प नसून मातृत्वाचा सन्मान, महिलांच्या गरजांची जाणीव आणि प्रवासी-केंद्रित एसटी व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले संवेदनशील पाऊल आहे, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

You Might Also Like

महावितरणच्या खासगीकरणाविरोधात राज्यभर वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन; उपोषण १७ ऑगस्टपर्यंत स्थगित
बुलडाणा अर्बनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘व्हायरल मिमिक्री रील स्पर्धा’
सिद्धेश मुसळेचे जेईई परीक्षेत यश; ओबीसी कॅटेगिरीत ऑल इंडिया रँक ११५ क्रमांक 
आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना बांधली पहिली राखी; रक्षाबंधनाच्या भेटीची चर्चा
आश्रमशाळांतील २,४२१ शिक्षक पदांच्या भरतीला वेग; १,६०० उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीस सुरुवात
TAGGED:125 ‘Hirkani Rooms’ at ST bus stations; Corporation signs agreement with Toyota Kirloskar.125 Hirakani Rooms१२५ हिरकणी कक्षBreastfeeding FacilitiesCSR Initiative MaharashtraDevendra FadnavisEknath ShindeFacilities for Lactating MothersHirakani KakshaLactating Mothers FacilitiesMaharashtra Public TransportMaharashtra STMaharashtra Transport DepartmentMaternal Care FacilitiesMSRTCMSRTC Bus StandMSRTC Toyota AgreementPratap SarnaikST Bus StationsSunetra Ajit PawarToyota KirloskarToyota Kirloskar CSRWomen EmpowermentWomen Friendly Bus StationsWomen Passenger SafetyWomen Safety Maharashtraएकनाथ शिंदेएसटी आणि टोयोटा करारएसटी बसस्थानकएसटी बसस्थानक सुविधाएसटी महामंडळएसटी महामंडळ बातमीटोयोटा किर्लोस्करदेवेंद्र फडणवीसप्रताप सरनाईकमहाराष्ट्र एसटीमहाराष्ट्र परिवहन विभागमहाराष्ट्रातील महिला प्रवासीमहिला प्रवाशांसाठी सुविधामहिला प्रवासी सुरक्षामहिला सक्षमीकरणमहिला सुरक्षामातांसाठी सुरक्षित जागामातृत्वाचा सन्मानसीएसआर उपक्रमसुनेत्रा अजित पवारस्तनदा मातांसाठी सुविधाहिरकणी कक्ष
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान’; नाशिकमधून लवकरच शुभारंभ
Next Article लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्र चर्चेत
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up