सहकार विद्या मंदिर, चिखली रोड येथील सांस्कृतिक भवनात ‘भ्रमाचा भोपळा’ या तीन अंकी नाटकाचा प्रयोग
बुलडाणा : बुलडाणा अर्बन परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यंदा मंडळाचा २५वा गणेशोत्सव असून, १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरवासीयांसाठी विविध दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध होणार आहे.
मंडळाची कार्यकारिणी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक (भाईजी), बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई सुकेश झंवर, अनंताभाऊ देशपांडे तसेच संस्थेचे सरव्यवस्थापक कैलास बन्सीलाल कासट यांच्या मार्गदर्शनाखाली निवडण्यात आली.
मंडळाच्या अध्यक्षपदी प्रशांत श्रीराम काळवाघे, उपाध्यक्षपदी अजय विजय पाटील, सचिवपदी विलास नारायण देवकर, सहसचिवपदी अजय पारसमल तातेड, तर कोषाध्यक्षपदी निलेश सुरेशराव बनसोडकर यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीत रविंद्र प्रभाकर कुळकर्णी, राहुल विठ्ठलराव डहाळे, दिनेश भास्कर राजपूत, संजय अंबादास पाठक, मंगेश प्रकाश बनसोड, संतोष नामदेव सोळंके, विनोद विष्णू कोलते, अनिल वासुदेव महाले, किशोर रामदास सावळे, अजय विजय कऱ्हाळे, सुनील गुलाबराव जाधव, कैलास तुळशीराम चव्हाण, श्रीकांत सखाराम भराड, संदीप मुकेश काळे, महेश किसन गायगोळ, राकेश दिलीप मुळे, प्रशांत देवदास घुसळकर, सौ. वर्षा अजितसिंग राजपूत, सौ. अनुराधा शैलेश कुळकर्णी आणि सौ. कल्पना रविंद्र जाधव यांचा समावेश आहे.
धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक उपक्रम
गणेशोत्सवाची सुरुवात ९ सप्टेंबर रोजी श्रींच्या मंडप पूजनाने, तर १४ सप्टेंबर रोजी गणेशमूर्ती स्थापना करून होणार आहे. १५ सप्टेंबर रोजी गोवर्धन इमारतीतील हॉलमध्ये अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ सप्टेंबर रोजी पुरुष कर्मचाऱ्यांसाठी ‘एक मिनिट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, याच दिवशी शालेय विद्यार्थ्यांसाठी रामायण, महाभारत आणि धार्मिक विषयांवर आधारित स्पर्धा होणार आहे. १७ सप्टेंबर रोजी ‘सुरसंगम’ या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनंताभाऊ देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
१९ सप्टेंबर रोजी पर्यावरणपूरक गौरी सजावट स्पर्धा, तर २० सप्टेंबर रोजी बुलडाणा शहरातील रिल्स कलाकारांसाठी ‘बुलडाणा व्हायरल मिमिक्री रिल्स’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी २१ सप्टेंबर रोजी ‘एक मिनिट’ स्पर्धा होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी सहकार विद्या मंदिर, चिखली रोड येथील सांस्कृतिक भवनात ‘भ्रमाचा भोपळा’ या तीन अंकी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाचे आणखी एक आकर्षण असलेल्या कर्मचारी लाईव्ह ऑर्केस्ट्राचे आयोजन २३ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांसाठी ‘कपल आयडॉल’ स्पर्धा होणार असून, त्याच दिवशी सकाळी ९ वाजता सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
२५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या माध्यमातून कर्मचारी आणि नागरिकांना एकत्र आणत धार्मिक वातावरणासोबतच कला, संस्कृती आणि मनोरंजनाला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांचा शहरातील नागरिक व गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रशांत श्रीराम काळवाघे, सचिव विलास नारायण देवकर आणि कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना बांधली पहिली राखी; रक्षाबंधनाच्या भेटीची चर्चा
