खामगाव, प्रतिनिधी : मिशन ओटू आणि नगर परिषद खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रीन झोन रनिंग उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात रनिंग पूर्ण झाल्यानंतर सहभागी धावपटूंनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
या स्पर्धेत निर्धारित वेळेत रनिंग पूर्ण केल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील ५१ वर्षीय महिला धावपटू सौ. अनिता युवराज कापरे यांचा सुप्रसिध्दी डॉ.विठ्ठल लहाने (लातूरकर) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वयाच्या ५१व्या वर्षीही नियमित धावण्याचा छंद जोपासत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या सौ. अनिता कापरे यांनी आपल्या कामगिरीतून महिलांसह सर्व वयोगटातील नागरिकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
BDCC: अनुमोदकांच्या सह्यांमुळे काँग्रेस अडचणीत?; जळगाव जामोदमध्ये राजकीय चर्चांना उधाण
