By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > खामगाव > बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २३ ऑगस्टला मतदान
खामगावबुलडाणा जिल्हाराजकीयविदर्भ

बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २३ ऑगस्टला मतदान

Team Batmivishwa
Last updated: July 20, 2026 1:35 pm
By Team Batmivishwa
Published: July 20, 2026
खामगाव बुलडाणा जिल्हा राजकीय विदर्भ
244 Views
3 Min Read
Share
3 Min Read
SHARE

बुलढाणा : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (बीडीसीसी) २०२६–२०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. या निवडणुकीत २३ ऑगस्ट रोजी मतदान आणि २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.

Contents
ठळक मुद्दे :संचालक मंडळाची रचनाराजकीय हालचालींना वेगबीडीसीसी निवडणुकीचा बिगुल; २३ ऑगस्टला मतदान, २४ ऑगस्टला मतमोजणी

ठळक मुद्दे :

  • २० जुलै : निवडणुकीची अधिसूचना जारी.
  • २० ते २४ जुलै : सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल.
  • २५ जुलै : उमेदवारी अर्जांची छाननी.
  • २७ जुलै : वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध.
  • २७ जुलै ते १४ ऑगस्ट : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत.
  • १४ ऑगस्ट : अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप.
  • २३ ऑगस्ट : सकाळी ८ ते सायंकाळी ५ मतदान.
  • २४ ऑगस्ट : मतमोजणी व निकाल जाहीर.
  • २५ ऑगस्ट : संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण.

संचालक मंडळाची रचना

  • १३ तालुकानिहाय मतदारसंघ – प्रत्येकी एक संचालक.
  • महिला प्रतिनिधींसाठी – २ जागा.
  • अनुसूचित जाती-जमाती – १ जागा.
  • मागासवर्गीय – १ जागा.
  • विमुक्त जाती-भटक्या जमाती/इतर मागासवर्गीय (ओबीसी) – १ जागा.

राजकीय हालचालींना वेग

  • दीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात राजकीय घडामोडींना वेग.
  • विविध गटांकडून उमेदवारांची चाचपणी आणि रणनीतीला सुरुवात.
  • बीडीसीसीच्या सत्तेसाठी यंदा चुरशीची लढत होण्याची शक्यता.

बीडीसीसी निवडणुकीचा बिगुल; २३ ऑगस्टला मतदान, २४ ऑगस्टला मतमोजणी

बुलढाणा

 दीर्घ प्रतीक्षेनंतर बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (बीडीसीसी) २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रमास मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला असून, २३ ऑगस्ट रोजी मतदान तर २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी गौतम वर्धन यांनी १६ जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला. त्यानुसार २० जुलै रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. त्याच दिवसापासून २४ जुलैपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.

उमेदवारी अर्जांची छाननी २५ जुलै रोजी होईल, तर २७ जुलै रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २७ जुलै ते १४ ऑगस्ट ही मुदत निश्चित करण्यात आली आहे. १४ ऑगस्ट रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

आवश्यकता भासल्यास २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

बीडीसीसी संचालक मंडळासाठी तालुकानिहाय १३ मतदारसंघांतून प्रत्येकी एक प्रतिनिधी निवडला जाणार आहे. याशिवाय महिला प्रतिनिधींसाठी दोन जागा, तसेच अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती अथवा इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. विविध गटांकडून उमेदवारांच्या चाचपणीला वेग आला असून, बीडीसीसीच्या सत्तेसाठी रंगतदार राजकीय लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सिंधूची जपान ओपनमध्ये ऐतिहासिक सुवर्ण भरारी!

‘जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच गोरगरीब विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल’ – गुलाबराव खरात

छत्रपती नगरातील शिंदे शिक्षक दाम्पत्याच्या घरी चोरी

NEET-UG 2026 चा निकाल जाहीर; 11.21 लाख विद्यार्थी पात्र, मुलींची पुन्हा सरशी

You Might Also Like

कर्जमाफीच्या मागण्यांसाठी तुपकरांचा सरकारला इशारा; २७ ऑगस्टला मुंबईत आंदोलन
अनुसूचित जाती कल्याण समितीचा अकोला दौरा १९ व २० ऑगस्टला; विभागांची तयारी सुरू
२५ वर्षांच्या सामाजिक कार्याचा सन्मान
‘हा फक्त शिंदे सेनेचा कार्यक्रम?’ आयुष रुग्णालयावरून भाजप जिल्हाध्यक्षांचा थेट सवाल
शिक्षक-पदवीधर निवडणुकीची रंजक मतमोजणी; विजयाचा कोटा कसा ठरतो?
TAGGED:२४ ऑगस्टला मतमोजणीElection schedule for Buldhana District Central Cooperative Bank announced; voting on August 23.बीडीसीसी निवडणुकीचा बिगुल; २३ ऑगस्टला मतदानबुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २३ ऑगस्टला मतदान
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article ‘जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच गोरगरीब विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल’ – गुलाबराव खरात
Next Article सिंधूची जपान ओपनमध्ये ऐतिहासिक सुवर्ण भरारी!
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up