A bull and a cow died due to electric shock in Sindkhedraja taluka.
तालुका पशुधन अधिकारी डॉ.मुंढे यांची घटनास्थळी भेट
बातमीविश्व टिम
सिंदखेडराजा
सिंदखेडराजा Sindkhedraja तालुक्यात शनिवारी दिनांक १७ मे २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसात विज पडून दोन शेतकर्यांचे पशुधन मृत्यूमुखी पडले आहे. विजेच्या धक्क्याने एक बैल आणि एक दुधाळ गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना तालुक्यातील दत्तापूर, राहेरी येथे घडली आहे. या घटनेची माहिती मिळाताच तालुका पशुधन अधिकारी डॉ.मुंढे Taluka Livestock Officer Dr. Mundhe यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
तालुक्यातील दत्तापूर येथील शेतकरी नारायण राम पवार यांचा अंदाजे ८० हजार रुपये किंमतीचा बैल वीज पडून जागीच मृत्युमुखी पडला आहे. तर दुसर्या घटनेत राहेरी येथील शेतकरी गोविंद पुंडलिक देशमुख यांची दुधाळ गाई अंदाजे बाजार किंमत ९० हजार रुपये ही सुद्धा विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडली. घटनेची माहिती मिळताच सिंदखेडराजा येथील तहसिदार अजित दिवटे Tehsidar Ajit Divate व नायब तहसीलदार डॉ प्रविणकुमार वराडे Deputy Tehsildar Dr. Pravin Kumar Varadeयांनी आपले ग्राम महसुल अधिकारी यांना घटनास्थळी पाठवून मृत जनावरांचा पंचनामा करण्याचे आदेश देऊन तालुका पशुधन अधिकारी डॉ.मुंढे यांनी दोन्ही घटनास्थळी भेट देत तात्काळ पंचनामा केला.
शेतकर्यांच्या या नुकसानीसाठी शासकीय मदतीची प्रक्रिया लवकर सुरू होणार असल्याचे शासकीय अधिकार्यांनी सांगितले आहे. तरी देखील शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गाकडून होत आहे.
