Let’s make a change… Uddhav Thackeray gives responsibility of spokesperson post to Adv. Jayashrintai
बातमीविश्व टिम
बुलडाणा जिल्ह्यात कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी महिलांच्या यादीत प्रथमस्थानी असणार्या अॅड.जयश्री सुनील शेळके यांच्याकडे बघितले जाते. अॅड.जयश्रीताईं यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना त्यांनी सहकार, महिला सक्षमीकरण, बचतगट, कृषी, उद्योग, राजकारण या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनची स्थापना केली. दिशा अर्बन पतसंस्थेची स्थापना करून महिलांना आर्थिक भांडवल उपलब्ध करून दिले, तसेच अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांच्या याच कार्याची दखल घेवून अॅड.जयश्री शेळके यांच्यावर शिवसेना प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती शिवसेना (उबाठा)च्या एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. तसेच शिवसेना(उबाठा)गटाचे वृत्तपत्र सामनामधून सुध्दा याबाबतचे वृत्त प्रसिध्द करण्यात आले आहे.
या सोबतच शिवसेना नेते अॅड.अनिल परब, शिवसेना उपनेता प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना जनसंपर्क प्रमुख अॅड.हर्षल प्रधान, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, आनंद दुबे यांचा देखील प्रवक्त म्हणून समावेश करण्यात आला आहे.
अॅड. जयश्री सुनील शेळके यांनी नुकताच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या विधानासभा निवडणूकीमध्ये त्यांचा ८४१ मतांनी पराभव झाला होता. त्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रतिनिधित्व करीत आहेत. बुलडाणा जिल्हयात विविध विकास कार्यातून त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. कर्तव्यनिष्ठ, बहुआयामी नेतृत्व म्हणून अॅड.जयश्रीताई शेळके यांनी आपले स्थान निर्माण केले आहे हे विशेष !
