मुलाला चांगले मार्क देवून शाळेतून पहिला नंबर आणू.. त्यासाठी आम्हाला खुशकर महिलेकडे शारिरीक सुखाची मागणी..
मलकापूरच्या त्या दोघा मास्तरांवर गुन्हा दाखल
बातमीविश्व टिम मलकापुर
मुलाला चांगले मार्क देवून शाळेतून पहिला नंबरंच आणू त्यासाठी आम्हाला खुश कर.. असे म्हणत जबरदस्तीने शारिरीक संभोग करून वारंवार शरीर सुखाची मागणी करत असलेल्या मलकापूर येथील दोन मास्तरांवर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, दि.२२ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिस स्टेशनला नूतन विद्यालयातील दोन शिक्षकांविरूध्द मलकापूर शहर पोलीस स्टेशला बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपी मास्तरांना अटक केली आहे.
पीडित ३४ वर्षीय महिलेने मलकापूर शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी समाधान इंगळे (वय ४५) रा.मधुवन नगर मलकापूर व अनिल थाटे (वय ४७ ) रा.यशोधाम नगर मलकापूर या दोघांनी तुझे मुलाला आम्ही चांगले मार्क मिळवून देवू, शाळेतून त्याचा पहीला नंबर आणू त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल असे म्हणून जबरदस्ती शारीरीक संभोग केले. तसेच वारंवार शरीर सुखाची मागणी केली.
मी शारीरीक संभोग करण्यास नाही म्हटले असता तुला व तुझे मुलाला जिवानिशी मारुन टाकू अशी धमकी दिली. सदर प्रकार हा १० सप्टेंबर २०२४ ते २२ एप्रिल २०२५ चे पूर्वी घडला असून त्यांनी वारंवार शारीरीक संभोग केला. त्यामुळे माझे परिवाराचे काही बरेवाईट झाल्यास समाधान इंगळे व अनिल थाटे हे जबाबदार राहतील असे तक्रारीत नमूद केले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये अप.नं. २६९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (स्), ७०(१), ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कोळासे करीत आहेत.
