सत्य, अहिंसा आणि ‘जय जवान, जय किसान’च्या विचारांचा जागर; युवकांनी महापुरुषांच्या त्यागातून प्रेरणा घ्यावी : डॉ.मोहम्मद इसरार
चिखली : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त चिखली काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या जयस्तंभ चौकातील जनसेवा कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद इसरार यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा गौरव केला. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली, तर लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत देशाच्या संरक्षणासोबतच शेतकऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले, असे त्यांनी सांगितले.
“सत्य, अहिंसा, सद्भावना, सर्वधर्म समभाव आणि परिश्रम ही महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनाची प्रमुख मूल्ये होती. राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांनी या महापुरुषांच्या त्याग, समर्पण आणि विचारांचा आदर्श घ्यावा,” असे प्रतिपादन डॉ. मोहम्मद इसरार यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानासह त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिसराची स्वच्छताही करण्यात आली.
कार्यक्रमाला रामभाऊ जाधव, अतहरोद्दीन काझी, सचिन बोंद्रे, नगरसेवक आसिफ भाई, गोपाल देव्हडे, वायाळ सर, गोकुळ शिगणे, शेख जाकीर भाई, खलील बागवान, डॉ. रविंद्र कमळस्कर, भास्कर चांदोरे, राहुल चवरे, विनोद बोर्डे, मलिक जमदार, राहुल इंगळे, अब्रार बागवान, राजू लहाने, अशोक पडघान, डॉ. संजय घुगे, आकाश पडघान, संजय गिरी, शेख अज्जू, शकील भाई, विशाल रिंढे यांच्यासह जिल्हा व चिखली काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
