चिखली : चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेता महाले, विद्याधरजी महाले, भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे आणि चिखली तालुका भाजपाध्यक्ष डॉ. कृष्णाजी सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दि. 12ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात डॉ. सपकाळ, अॅड. ए. टी. देशमुख (नाना), अंकुशराव पाटील, संजय गाडेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे भगवानराव काळे, बाजार समितीचे माजी संचालक तथा माजी सरपंच सतीश अंभोरे, दीपक जाधव, अशोकराव अंभोरे, दिनकरराव अंभोरे, नामदेवराव सदार आणि विलास जाधव यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राहिलेले पाच जण आता भाजपमध्ये दाखल झाल्याने चिखली तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या संघटनेत तालुकास्तरावर महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेल्या या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आगामी काळात चिखली मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात भाजपच्या बाजूने नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील दहा मान्यवर कलावंतांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने राष्ट्रीय सन्मान
