By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > विदर्भ > आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश; चंद्रपूरच्या विकास प्रश्नांवर २८ जुलैला उच्चस्तरीय बैठक
राजकीयविदर्भसमोरच्या बाकावरुन

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश; चंद्रपूरच्या विकास प्रश्नांवर २८ जुलैला उच्चस्तरीय बैठक

Team Batmivishwa
Last updated: July 27, 2026 12:23 am
By Team Batmivishwa
Published: July 27, 2026
राजकीय विदर्भ समोरच्या बाकावरुन
34 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या, बल्लारपूर ESIC रुग्णालय, महिला औद्योगिक वसाहत आणि विदर्भ वीज प्रोत्साहन योजनेवर होणार निर्णयात्मक चर्चा

मुंबई, प्रतिनिधी :
चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी आणि शेतकरी, उद्योग, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे विषय मार्गी लावण्यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत राज्य शासनाने २८ जुलै रोजी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. सार्वजनिक आरोग्य, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

एमएसआरडीसी कार्यालय, निर्मल भवन (सातवा मजला), मुंबई येथे दुपारी ३ वाजता होणाऱ्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी पंपांना तातडीने वीज जोडण्या देणे, बल्लारपूर येथे ESIC रुग्णालयासाठी जमीन उपलब्ध करून देणे, महिला औद्योगिक वसाहतीसाठी जागा उपलब्ध करणे तसेच विदर्भासाठी स्वतंत्र वीज प्रोत्साहन योजनेच्या अंमलबजावणीसह विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

बैठकीत बल्लारपूर येथील बंद पॉवर हाऊस परिसरातील ३१.३५ हेक्टर जागा ESIC रुग्णालय, राज्य राखीव पोलीस बल आणि महिला औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावरही विचारविनिमय केला जाणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांनुसार कृषी पंपांच्या प्रलंबित वीज जोडण्यांचा प्रश्नही प्राधान्याने चर्चिला जाणार आहे.

या बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), ESIC, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून विविध विषयांवर आवश्यक निर्णय घेण्यासाठी सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तसेच मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. शेतकऱ्यांना वेळेत वीज जोडण्या मिळाव्यात, उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, बल्लारपूर परिसरात अत्याधुनिक आरोग्य सुविधा निर्माण व्हाव्यात आणि विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने शासनाचे लक्ष वेधले आहे.

या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न आता निर्णयप्रक्रियेच्या टप्प्यावर पोहोचले असून, २८ जुलै रोजी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होऊन जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

You Might Also Like

सुनील कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या मोताळा तालुकाध्यक्षपदी फेरनिवड
आठ शिक्षकांची पदे मंजूर; प्रत्यक्षात केवळ सहा शिक्षक कार्यरत
बुद्ध रश्मी महाविहाराचा १२ सप्टेंबरला शिलान्यास सोहळा
गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी संधी; राज्य, राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार स्पर्धा
सिंधूची जपान ओपनमध्ये ऐतिहासिक सुवर्ण भरारी!
TAGGED:MLA Sudhir Mungantiwar’s follow-up efforts bear fruit; high-level meeting on Chandrapur’s development issues scheduled for July 28.आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश; चंद्रपूरच्या विकास प्रश्नांवर २८ जुलैला उच्चस्तरीय बैठकचंद्रपूर जिल्ह्यातील कृषी पंपांना तातडीने वीज जोडण्या देणेबल्लारपूरबल्लारपूर ESIC रुग्णालयमहिला औद्योगिक वसाहत आणि विदर्भ वीज प्रोत्साहन योजनेवर होणार निर्णयात्मक चर्चाशेतकऱ्यांच्या वीज जोडण्या
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article वानर आडवे आल्याने दुचाकीचा भीषण अपघात; अजय चव्हाण गंभीर जखमी, वानराचा मृत्यू
Next Article BDCC: अनुमोदकांच्या सह्यांमुळे काँग्रेस अडचणीत?; जळगाव जामोदमध्ये राजकीय चर्चांना उधाण
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up