हो.. मी अजून जगलोच नाही….!
परिस्थितीशी झगडत राहीलो ,
त्या सुखाची वाट धरता धरता,
हो,.. मी अजून जगलोच नाही,
दारिद्र्यावर मात करता करता,
आयुष्य खूप सुंदरच आहे,
कानावर कुणी धाडले होते,
पण झाले प्रत्यक्षात असे,
गरिबीने खड्डेच पाडले होते.
सतत करून मनाशी चिंता,
आयुष्य थोडे थोडे घटक गेले,
पाचीलाच पुंजली ही गरिबी,
कधी कधी मनाला पटत गेले ,
कुठे तरी आता बदल दिसतो,
पण गेले आयुष्य अर्धे निघून,
असा कसा खेळ आयुष्याचा,
भरून आले डोळे चित्र बघून,
संस्काराने असा प्रवास केला,
नितिला सोडून वागलोच नाही,
त्या सुखाची वाट धरता धरता,
हो…मी अजून जगलोच नाही,
नवनीत शिरसाट
मो.८८८८२४४००६
खरबडी ता.मोताळा
