By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > उत्तर महाराष्ट्र > वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी मुक्कामस्थळांसह संपूर्ण पालखी मार्गावर पुरेसा बंदोबस्त ठेवावा: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
उत्तर महाराष्ट्रधार्मिकपश्चिम महाराष्ट्रमराठवाडाविदर्भविविधसांस्कृतिक

वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी मुक्कामस्थळांसह संपूर्ण पालखी मार्गावर पुरेसा बंदोबस्त ठेवावा: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Team Batmivishwa
Last updated: June 13, 2026 10:34 am
By Team Batmivishwa
Published: June 13, 2026
उत्तर महाराष्ट्र धार्मिक पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ विविध सांस्कृतिक
188 Views
4 Min Read
Share
4 Min Read
SHARE

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची तत्परता

पैठण, मुक्ताईनगर, जळगाव ,कौडीन्यपूर, अमरावती येथून येणार्‍या पालख्यांनी छत्रपती संभाजी नगर विभागातील सुविधा बाबतअशीच बैठक घेवून नियोजन करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तात्काळ छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त यांना फोन लावून या सर्वांची बैठक लावून यांच्या सर्व अडचणी सोडवाव्यात असे निर्देश दिले. त्यावेळी सर्व संस्थानच्या विश्वस्तानी आनंद व्यक्त केला.

पुणे- वारकर्‍यांसाठी स्वच्छ शौचालये, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्रे आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी. निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवून शौचालयांची नियमित स्वच्छता करावी. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी, अन्नपदार्थांतील भेसळ रोखणे आणि आरोग्यविषयक उपाययोजनांवर विशेष भर देण्याचे निर्देश देत श्रीमती पवार म्हणाल्या की, आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी. चंद्रभागा नदी परिसरात आवश्यक तेथे बचाव पथके आणि नौकांची व्यवस्था करावी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशीसाठी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूवरून संत तुकाराम महाराज आणि सासवड येथील संत सोपानकाका संस्थानकडून पालखी सोहळ्याची मोठी परंपरा असून, याबरोबर राज्यातील इतर संताच्या पालखी सोहळा पुणे विभागात आल्यानंतर आज पर्यंतच्या परंपरेला साजेसा आणि वारकर्‍यांसाठी अधिक सुविधायुक्त सोहळा आयोजित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

आषाढी पालखी सोहळा-२०२६ च्या नियोजनाबाबत झुंबर हॉल, पुणे विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, विभागीय आयुक्त शितल तेली उगले, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालखी सोहळ्यांशी संबंधित प्रमुख विश्वस्त, पालखी प्रमुख, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. दरवर्षी लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पार्श्वभूमीवर प्रत्येक वारकर्‍याला सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पालखी प्रमुखांनी बैठकीत मांडलेल्या सूचना आणि अडचणींची दखल घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

पावसाळ्याच्या कालावधीत वारी होत असल्याने पालखी मार्गावरील रस्ते, मुक्कामस्थळे आणि विसावा स्थळांवर चिखल होणार नाही यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची कामे पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मार्गावरील अपूर्ण कामे पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.

वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी मुक्कामस्थळांसह संपूर्ण पालखी मार्गावर पुरेसा बंदोबस्त ठेवावा. गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, छेडछाड, चोरी व अन्य गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागत कमानी, फलक किंवा इतर संरचनांमुळे अपघात होणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. पालखी सोहळा विश्वस्त, दिंडी प्रमुख आणि स्थानिक प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय राहिल्यास सोहळा अधिक यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करून श्रीमती पवार यांनी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून वारकर्‍यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश केले.

बैठकीत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांची नोंद घेण्यात आली असून त्यानुसार आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच पुढील आढावा बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विभागीय आयुक्त शितल तेली उगले यांनी मागच्या आठवड्यात तिन्ही जिल्ह्यातून जाणार्‍या पालखी मार्गाची पाहणी करून सर्व सोय सुविधाची पाहणी केल्याचे सांगून जिथे जिथे कामं अपूर्ण आहेत, त्या कामाला गती देऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. यावेळी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा दिला.

उद्या नामांकित महिला सायकलपटू बुलढाण्यात होणार दाखल

८६ हजार एसटी कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गोड बातमी

You Might Also Like

विष्णूआप्पा सावळारामआप्पा घोडेस्वार यांचे निधन
प्रा.डॉ.राहूल इंगळे यांना इंग्रजी विषयात आचार्य. (P.hd) पदवी जाहिर
येलो मोझॅकच्या प्रादुर्भावासह पावसाअभावी पिके माना टाकू लागली
राज्यात २२ जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा; डिसेंबरमध्ये बिगुल वाजण्याची शक्यता
पावसाने दडी मारलेल्या भागात कृत्रिम पर्जन्य प्रयोग राबवा
TAGGED:आषाढी पालखी सोहळा-२०२६उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारपिंपरी-चिंचवडपुणेसातारासोलापूर
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article उद्या नामांकित महिला सायकलपटू बुलढाण्यात होणार दाखल
Next Article तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेत धडक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up