By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > उत्तर महाराष्ट्र > एकल पालक असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देणार : मंत्री दादाजी भुसे
उत्तर महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकीय

एकल पालक असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देणार : मंत्री दादाजी भुसे

Team Batmivishwa
Last updated: May 14, 2026 9:51 pm
By Team Batmivishwa
Published: May 14, 2026
उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र राजकीय
31 Views
3 Min Read
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ, निराश्रित, बेघर आणि निवार्‍याची गरज असलेल्या १८ वर्षापर्यंतच्या मुला-मुलींना संगोपन आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रति बालक दरमहा २२५० रुपयांचे परिपोषण अनुदान दिले जाते. राज्यात २ लाख २३ हजारांहून अधिक विद्यार्थी आई, वडील किंवा दोन्ही नसलेले असे आहेत. अशा निकषांची पूर्तता करणार्‍या सर्व पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, शालेय शिक्षण आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यात एकल पालक असलेल्या बालकांची संख्या मोठी असून अनेक बालके या योजनेपासून वंचित आहेत. अशा निकषांची पूर्तता करणार्‍या विशेषत: जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. ज्या पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळत नाही अशा विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन महिला व बालविकास विभागाकडे सादर करण्यासाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घ्यावा, असे कळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिकाम्या असलेल्या वर्ग खोल्या अंगणवाडीसाठी उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षण संचालकांनी एका आठवड्यात आढावा घेऊन यादी सादर करावी, असे निर्देश मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. त्याचबरोबर प्री स्कूल अभ्यासक्रमासंदर्भात पात्रता असलेल्या अंगणवाडी सेवकांना शालेय शिक्षण विभागामार्फत सहा महिन्यांचे प्रशिक्षण तातडीने देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केअर अँड प्रोटेक्शन ची आवश्यकता असलेल्या बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या बालसंगोपन योजनेविषयी सविस्तर माहिती देऊन सध्या एक लाख ५९ हजार विद्यार्थ्यांना हा लाभ दिला जात असल्याची माहिती दिली. आधार संलग्न असलेल्या या योजनेच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने इतर सर्व पात्र वंचित विद्यार्थ्यांना हा लाभ मिळवून दिला जाईल. प्री स्कूल अभ्यासक्रमासाठी सध्या महिला व बालविकास विभागाकडे ५० हजार अंगणवाडी सेविकांची नोंदणी झाल्याची माहिती देऊन उर्वरित अंगणवाडी सेविकांची नोंदणी करुन घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येणार आहे. याबाबत या बैठकीत सादरीकरण करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पूर्वइतिहास कळण्यासाठी ही तपासणी विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर करण्यात यावी, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली.

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा विशेष दिलासा

मोताळा ते खामगाव बस सुरू करा, अन्यथा आंदोलन : लुकमान शाह उपसरपंच

You Might Also Like

मेहकरमध्ये महिलेची रस्त्यावरच प्रसूती; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर; बुलढाण्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा घेतला आढावा
आधुनिक हिरकणींचा बुलढाण्यात हुंकार; मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला महिलांचे समर्थन
समृद्धी महामार्गावर  मंगळवारी तासभर वाहतूक बंद राहणार; बुलढाणा–जालना दरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम
जुन्या शाळेच्या आठवणींना उजाळा; नगरसेवक विनोद बेंडवाल यांनी वाढदिवशी केले वृक्षारोपण
TAGGED:मंत्री दादाजी भुसेमहिला व बालविकास विभागशालेय शिक्षण मंत्री तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article मोताळा ते खामगाव बस सुरू करा, अन्यथा आंदोलन : लुकमान शाह उपसरपंच
Next Article आंबेडकरी साहित्य अकादमी बुलडाणाच्या वतीने राज्यस्तरीय गझल स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ थाटात संपन्न
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up