१२ जूनपासून थरार रंगणार
प्रतिका रावल हीला संधी नाही
हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार
प्रतिका रावल हीला संधी नाही
हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार
बातमीविश्व टिम
नवी दिल्ली
आगामी वुमन्स टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला आता मोजून काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेचा १२ जूनपासून थरार रंगणार आहे. मात्र यामध्ये वनडे टीममधील ओपनर प्रतिका रावल हीला संधी देण्यात आलेली नाही. तसेच ऑलराउंडर स्नेह राणा, अमनजोत कौर आणि हर्लीन देओल यांनाही स्थान मिळालेलं नाही.

या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी बीसीसीआयने शनिवारी २ मे रोजी वुमन्स टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सांगलीकर स्मृती मंधाना हीच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.वुमन्स टीम इंडियाने काही महिन्यांपूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. टीम इंडियाची वर्ल्ड कप जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली होती. निवड समितीने या टी २० वर्ल्ड कपसाठी गेल्या स्पर्धेतील अपवाद वगळता बहुतांश खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र फॉर्मेट वेगळा असल्याने काही खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. टी २० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघा युवा विकेटकीपर फलंदाज यास्तिका भाटीया हीचं कमबॅक झालं आहे. यास्तिकाचं तब्बल २ वर्षांनी कमबॅक झालं आहे.
टीम इंडिया महिला संघामध्ये यांचा समावेश
- हरमनप्रीत कौर (कप्तान)
- स्मृती मंधाना (उपकर्णधार)
- शफाली वर्मा
- जेमिमाह रोड्रिग्स
- भारती फुलमाळी
- दीप्ती शर्मा
- ऋचा घोष
- श्री चरणी
- यास्तिका भाटिया
- नंदिनी शर्मा
- अरुंधति रेड्डी
- रेणुका ठाकुर
- क्रांती गौड
- श्रेयंका पाटील
- राधा यादव
