गिरीष पळसोदकर
खामगाव – परमपूज्य आगाशे काका माऊलींचे कैलास जूनगडे हे बालपणापासून भक्त आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते श्रद्धेपोटी सेवा देत आहे. एक दिवस जुनगडे यांच्या स्वप्नात परमपूज्य आगाशे काका माऊली आली आणि त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती सांगून तुला आता तुझे शरीर सांभाळायचे आहे असे सांगून ते निघून गेल्याचे जूनगडे यांनी सांगितले.त्यानंतर जुनगडे यांना थोडे थोडे आठवायला लागले. मात्र या घटनेत जूनगडे यांचा एक डोळा निकामी झाला आहे. केवळ परमपूज्य आगाशे काका माऊलींमुळे मला जीवनदान मिळाले,असे ते मानतात.
पायात चप्पल न घालण्यामागे त्या व्यक्तीच्या मनात काहीतरी स्वार्थ भाव असतो पण त्याला येथील जलंब नाक्याजवळ राहणारे ५१ वर्षीय कैलास वैजनाथ जूनगडे हे अपवाद ठरले आहे. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे कैलास जुनगडे यांना अनवाणी राहिल्यास आपल्या पायास दगड बोचतील, काटे रुततील, उन्हाचे चटके लागतील आणि मुख्य म्हणजे विजेचा धक्का लागेल अशी मनात भीती वाटत नसल्यामुळे ते आपली दिनचर्या अनवाणीने राहून सहज पार करीत आहेत. विशेष म्हणजे अनवाणी पायी चालून नर्मदा परिक्रमेसह अनेक पालख्यांमध्ये सहभागी होतात.अनवाणी चालल्यानंतर त्यांच्या पायांना अद्याप पावेतो कोणत्याही प्रकारची इजा न होणे हा एक प्रकारे दैवी शक्तीचा चमत्कार आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कैलास जुनागडे यांनी जंगलातून अनवाणी पायदळ मार्गक्रमण करीत नर्मदा परिक्रमा तर पूर्ण केली केलीच त्याचबरोबर दरवर्षी परमपूज्य नाना महाराज, परमपूज्य आगाशे काका माऊलींच्या बरसाना येथून खामगाव ते कारंजा लाड येथे जाणार्या पालखीतील पायदळ वारीत ते अनवाणी सहभागी होत असतात. त्याचबरोबर हरी हरानंद महाराजांची सोनई येथून माहूरसाठी पालखी जाते. त्या पालखीत पण एकदा नव्हे दोनदा नव्हे तर पाच वेळा त्यांनी अनवाणीने पायदळ वारी केली आहे. तीर्थक्षेत्रांबरोबरच अनेक गावी अनवाणी पायदळ चालून गेले आहे. जे लोक अनवाणी चालतात त्यांच्या पायाची खालील बाजू कडक होते परंतु त्यांचे पाऊल आजही नरम आहे .
उन्हाळ्यात सिमेंट अथवा डांबरी रोडने अनवाणी चालून मार्गक्रमण करताना पायाला चटके बसत नाही आणि चटके लागतील असे जुनगडे यांच्या मनात आतापर्यंत आले नाही. चालू विद्युत पुरवठ्यात दुरुस्तीचे काम पण ते अनवाणीने करीत आहे. आज इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे लोक पायात चप्पल असल्याशिवाय काम करीत नाही, पण त्याला जूनगडे अपवाद ठरले आहेत.
कैलास जूनगडे यांनी पायात चप्पल घातल्याने घडली अघटीत घटना..
खामगाव येथून अयोध्येला पालखीसोबत अनवाणी जात असताना त्या पालखीसोबत खामगाव येथील चार-पाच व्यक्ती होत्या. त्यापैकी एकाला पालखी खांद्यावर घ्यायची असल्याने त्याने त्याच्या पायातील चप्पल कैलास जूनगडे यांना घालण्यास दिली असता जुनगडे यांनी चप्पल पायात घालण्यास नकार दिला. परंतु त्या व्यक्तीने पायात चप्पल घालण्याची गळ घातल्यामुळे नाईलाजाने ती चप्पल त्यांनी पायात घातली आणि मार्गक्रमण करू लागले असताना जबलपूर गावाजवळ समोरून ट्रक आला आणि त्या ट्रक मधील काहीतरी त्यांच्या डोक्यात पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना लगेच दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. जवळपास तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरु होते पण त्यांना काहीच आठवत नव्हते. हि अघटीत घटना चप्पल घातल्यानंतर घडली, असे ते म्हणतात.
