वृक्षमित्र ग्यानदेव जाधव पाटील यांचा गाईच्या गौर्यातून अंत्यविधी
अंत्यविधीची राख आंब्याच्या व पेरूच्या झाडांना
बातमीविश्व टिम बुलडाणा
बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथील रहिवाशी वृक्षमित्र ग्यानदेव रामभाऊ जाधव पाटील यांच्या अंत्यविधीसाठी वृक्षतोड केलेले लाकडांचा वापर न करता गाईच्या शेणापासून बनलेल्या गोर्यामध्ये अंत्यविधी करण्यात आला तसेच ग्यानदेव पाटील यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमात सुद्धा आज एक नवीन पायांडा कौतिकराव पाटील कोलवडकर यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी वडिलांची रक्षा ही त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडांना व पेरूच्या झाडांना टाकून रक्षा विसर्जन केला.

कोलवडचे स्व.ग्यानदेव रामभाऊ जाध पाटील यांना सुरुवातीपासून वृक्ष लागवडीविषयी प्रेम व आवड असल्यामुळे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही झाडाची तोड न करता आपले जीवन जगत आले. त्यामुळेच त्यांच्या संपूर्ण परिवारांनी त्यांच्या अंत्यविधी पासून ते रक्षा विसर्जनापर्यंत त्यांच्या राखेचा एक कण सुद्धा वाया न जाऊ देता अंत्यविधीची राख आंब्याच्या व पेरूच्या झाडांना विसर्जित Funeral ashes are scattered on mango and guava trees. केली.
कौतिकराव पाटील यांच्या कुटुंबांनी २३ मे २०२५ रोजी हा नवा पायंडा सुरू केला आपण जी राख नदीमध्ये धरणामध्ये ज्या-ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी विसर्जित करतो आणि तेच पाणी आपण पिण्याकरता वापरतो ते कितपत योग्य आहे हे आपलं आपणच ठरवावं. या पिण्याच्या पाण्याची धरणातील पाण्याची रक्षा विसर्जन करून अशुद्ध पाणी करण्यापेक्षा कौतिकराव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी अशा प्रकारे रक्षाविसर्जन आंब्याच्या व पेरूच्या झाडांना केले. आज बाबांच्या सावडण्याचा कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या दिवशी करण्यात आले. यावर समाजातील प्रत्येक घटकाने गांभीर्य पूर्वक चिंतन करून वृक्ष संवर्धनासह गोमाता समजल्या जाणार्या गाई वाचवण्यासाठी व शेतकर्यांच्या उत्पन्नात भर पडून संवर्धनाची गरज आहे.
– कौतिकराव पाटील, कोलवड ता.बुलडाणा.
