३८ कॉलेजचा निकाल शून्य टक्के
बातमीविश्व टिम
नुकताच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालानुसार यंदाचा निकाल हा 1.49 टक्क्यानी कमी लागला आहे. मागील फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल 93.37% होता तर यंदाचा
फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के इतका लागला आहे. यावर्षीच्या बारावी निकालामध्ये एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण प्राप्त झालेले नाही हे विशेष… तर
१ हजार ९२९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर ३८ कॉलेजचा निकाल शून्य टक्के लागला आहे. यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९४.५८ टक्के इतका लागला आहे. तर मुलांचा निकाल ८९.५१ टक्के इतका लागला आहे.
यंदाही राज्यात मुलींची बाजी
विज्ञान- ९७.३५
कला- ८०.५२
वाणिज्य- ९२.६८
व्यवसाय अभ्यासक्रम- ८३.०३
आयटीआय- ८२.०३
एकूण नउ विभाग असून ते पुढील प्रमाणे कोकण- ९६.७४ प्रथम क्रमांकावर असून द्वतिय क्रमांकावर कोल्हापूर- ९३.६४ असून तिस-यास्थानी मुंबई-९२.९३ आहे. तर पुणे -९१.३२, नागपूर- ९०.५२
संभाजीनगर-९२.२४, अमरावती-९१.४३, नाशिक- ९१.३१, लातूर-८९.४६
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दि. ५ मे, २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१) https://results.digilocker.gov.in
४) https://results.targetpublications.org
५) https://results.navneet.com
६) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
७) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hse-12-results
८) https://www.indiatoday.in/education-today/results आणि
९) https://www.aajtak.in/education/board-exam-results
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.
