By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > मराठवाडा > कुणबी प्रमाणपत्र रद्दप्रकरणी सरकारवर जरांगेंचा घणाघात  “सरकारला बेजार करेल, अनेक जागा पाडेल” असा इशारा
मराठवाडाराजकीयसमोरच्या बाकावरुन

कुणबी प्रमाणपत्र रद्दप्रकरणी सरकारवर जरांगेंचा घणाघात  “सरकारला बेजार करेल, अनेक जागा पाडेल” असा इशारा

Team Batmivishwa
Last updated: August 6, 2026 3:42 pm
By Team Batmivishwa
Published: August 6, 2026
मराठवाडा राजकीय समोरच्या बाकावरुन
138 Views
3 Min Read
Share
3 Min Read
SHARE

Jarange lashes out at the government over the cancellation of the Kunbi certificate; warns, “I will make life miserable for the government and cause the defeat of candidates in many constituencies.”

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सरकारवर गंभीर आरोप केले. सरकार दबावाखाली काम करत असून, जाणीवपूर्वक आणि खोटारडेपणाने कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून, सरकारने या विषयात पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. तसेच स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणवणारे शिंदे सेनेतील आणि भाजपातील नेते मराठा समाजावर अन्याय होत असताना मौन का बाळगत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. समाजाच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी सत्तेच्या दबावाखाली गप्प बसण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचा आरोपही जरांगेंनी केला.

जरांगे म्हणाले, “मी सरकारला अनेक वेळा सांगितले होते की, हा खेळ करू नका. हे आपल्या समाजातीलच लोक आहेत. बावनकुळे यांच्याबाबतही मी अनेकदा चांगले बोललो. मात्र, त्यानंतर अधिकाऱ्यांना फोन करून तात्पुरत्या नोंदी घ्या आणि नंतर ती प्रमाणपत्रे रद्द करा, अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे हजारो कुटुंबांवर अन्याय झाला आहे.”

सरकारच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप करत त्यांनी आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. “आता मी सरकारला बेजार करेल. सरकारला जनतेसमोर उत्तर द्यावे लागेल. आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या अनेक जागा पाडेल. समाजाशी केलेला विश्वासघात जनता विसरणार नाही,” असे ते म्हणाले.

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात मराठा समाजात नाराजी वाढत असून, या प्रकरणात सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सरकारकडून अद्याप जरांगे यांनी केलेल्या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या मुद्द्यावर पुढील काही दिवसांत राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘मला एकटा पाडण्यासाठी सरकारचा नियोजित कट’; जरांगेंचा गंभीर आरोप

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत, मागील दोन दिवसांपासून सरकारकडून आपल्याविरोधात नियोजित कट रचला जात असल्याचा दावा केला.

“कालपासून राज्यात सरकारकडून एक कट शिजवला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडून हा कट रचला जात आहे. कुणबी नोंदी द्यायच्या त्यांनीच आणि नंतर ती प्रमाणपत्रे रद्दही त्यांनीच करायची, असा डाव आखण्यात आला,” असा आरोप जरांगे यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, “मला समाजापासून वेगळे पाडण्यासाठी आणि एकटा पाडण्यासाठी सरकारने जाणूनबुजून हा कट रचला आहे. हा संपूर्ण कट पूर्वनियोजित आणि ठरवून करण्यात आला आहे.”

या घडामोडींवर आपण विविध लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याचे सांगत, पुढील आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जरांगे यांच्या या आरोपांमुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारकडून मात्र या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

मंत्र्यांना शिंदेंचा इशारा; तीन मंत्र्यांची नावे चर्चेत, कामगिरी सुधारण्याचे आदेश

विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल-डिझेल बंद? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा प्रस्ताव; ई-चलानही होणार स्वयंचलित

You Might Also Like

कोणाच्या विवाह सोहळ्यानिमित्त येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलडाणा जिल्हा दौर्‍यावर
वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये निवृत्तीवेतन
मलकापुरात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून तीन बालकामगारांची मुक्तता
३ ऑक्टोबरला वाशी येथे रिपब्लिकन पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन
एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी घोषणा; तुकाराम मुंढेंकडे चौकशी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी?
TAGGED:"I will make life miserable for the government and cause the defeat of candidates in many constituencies."Jarange lashes out at the government over the cancellation of the Kunbi certificate; warnsएकनाथ शिंदेकुणबी नोंदीकुणबी प्रमाणपत्रदेवेंद्र फडणवीसमनोज जरांगे पाटीलमराठा आंदोलनमराठा आरक्षणमहाराष्ट्र राजकारणमहाराष्ट्र सरकारराधाकृष्ण विखे पाटील
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article डॉक्टर विरुद्ध डॉक्टर नव्हे… रुग्णहिताचा तोल महत्त्वाचा!
Next Article संवेदनशिल गाव उटी अन् कॉल करुन दारुड्याने पोलीसांना फिरवलं.. कुठी कुठी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up