By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > विदर्भ > जाधव कुटुंबाची तिहेरी माघार; महिला, कृषी प्रक्रिया अन् ओबीसी मतदारसंघातील समीकरणे बदलली
बुलडाणा जिल्हाराजकीयविदर्भ

जाधव कुटुंबाची तिहेरी माघार; महिला, कृषी प्रक्रिया अन् ओबीसी मतदारसंघातील समीकरणे बदलली

Team Batmivishwa
Last updated: August 10, 2026 11:43 pm
By Team Batmivishwa
Published: August 10, 2026
बुलडाणा जिल्हा राजकीय विदर्भ
85 Views
4 Min Read
Share
4 Min Read
SHARE

बुलढाणा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नामांकन मागे घेण्याची मुदत उद्या, मंगळवारी संपणार असून, त्याआधी आज सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी तब्बल ३० व्यक्तींनी आपली ३६ नामांकने मागे घेतली. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, त्यांच्या पत्नी राजश्रीताई प्रतापराव जाधव आणि त्यांचे बंधू उल्हास गणपतराव जाधव यांच्या माघारीने राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले आहे.

Contents
शिंगणे समर्थकांची संख्या अधिक?व्हीजेएनटीमध्ये रायमुलकरांना दिलासा?कृषी प्रक्रिया मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यतादेऊळगाव राजा मतदारसंघात आता दोनच उमेदवारउद्या दुपारनंतर चित्र स्पष्टआज माघार घेतलेल्या प्रमुख नामांकनांचे मतदारसंघनिहाय चित्रआज माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे

प्रतापराव जाधव यांनी कृषी प्रक्रिया व पणन मतदारसंघातून, राजश्रीताई जाधव यांनी महिला राखीव मतदारसंघातून, तर उल्हास जाधव यांनी ओबीसी व वैयक्तिक मतदारसंघातून आपली नामांकने मागे घेतली. जाधव कुटुंबातील तिघांनी एकाच वेळी माघार घेतल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव जाधव हे सुरुवातीलाच अविरोध निवडून आले आहेत. मात्र, कृषी प्रक्रिया व पणन मतदारसंघात स्वतःचे नामांकन, महिला राखीव मतदारसंघातून पत्नी राजश्रीताई यांचे आणि ओबीसी व वैयक्तिक अशा दोन मतदारसंघांत बंधू उल्हास जाधव यांची नामांकने असल्याने जाधव कुटुंबाच्या बहुविध उमेदवारीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता तिघांनीही माघार घेतल्याने या मतदारसंघांतील इतर इच्छुक उमेदवारांसाठी वाट मोकळी झाली आहे.

शिंगणे समर्थकांची संख्या अधिक?

आज नामांकन मागे घेणाऱ्यांमध्ये डॉ. राजेंद्र शिंगणे आणि प्रतापराव जाधव यांच्या समर्थकांची संख्या अधिक असल्याचे चित्र दिसून आले. त्यातही डॉ. शिंगणे समर्थकांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र, घाटाखालील भागातील इच्छुकांच्या माघारीची संख्या तुलनेने अत्यल्प असल्याचे दिसून आले. महिला राखीव मतदारसंघातून राजश्रीताई जाधव यांनी घेतलेली माघार विशेष महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील काही महिला नेत्यांची निवडणूक अधिक सुकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

व्हीजेएनटीमध्ये रायमुलकरांना दिलासा?

व्हीजेएनटी मतदारसंघातून दोन इच्छुकांनी माघार घेतल्याने माजी मंत्री संजय रायमुलकर यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, या मतदारसंघातील अंतिम स्पर्धेचे चित्र उद्या नामांकन माघारीची मुदत संपल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

कृषी प्रक्रिया मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता

कृषी प्रक्रिया व पणन मतदारसंघातून काल डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी, तर आज प्रतापराव जाधव यांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे आता या मतदारसंघात मंत्री आकाश फुंडकर, धृपतराव सावळे आणि आमदार श्वेताताई महाले यांच्या नावांची चर्चा आहे. उद्यापर्यंत या मतदारसंघातून आणखी कोण माघार घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देऊळगाव राजा मतदारसंघात आता दोनच उमेदवार

देऊळगाव राजा कृषी सेवा सोसायटी मतदारसंघात आज एकाच दिवशी सहा इच्छुकांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे आता या मतदारसंघात उषा भगवान मुंढे आणि कावेरी सोनसळे या दोघींचीच नामांकने शिल्लक राहिली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात थेट आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उद्या दुपारनंतर चित्र स्पष्ट

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नामांकन माघारीचा उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या दुपारनंतर निवडणुकीचे बहुतांश चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून निवडणूक अविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. हे प्रयत्न कितपत यशस्वी होतात आणि अंतिमतः किती जागांवर प्रत्यक्ष निवडणूक होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आज माघार घेतलेल्या प्रमुख नामांकनांचे मतदारसंघनिहाय चित्र

  • ओबीसी : ११
  • महिला : ५
  • वैयक्तिक/पतसंस्था : ८
  • देऊळगाव राजा कृषी सेवा सोसायटी : ६
  • व्हीजेएनटी : २
  • एससी/एसटी : १
  • मोताळा कृषी सेवा सोसायटी : १

आज माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे

सुनिल उदयकार (मोताळा कृषी सेवा सोसायटी), वसंतराव मगर (वैयक्तिक), डॉ. राजेश्वर उबरहंडे (ओबीसी व वैयक्तिक), रियाजखान पठाण (ओबीसी व वैयक्तिक), डॉ. तेजराव नरवाडे (ओबीसी व वैयक्तिक), सविता तेजराव नरवाडे (महिला), महादेव जगन्नाथ पाटील (वैयक्तिक), प्रमोद एकनाथ टेकाळे (ओबीसी), गोविंद शेषराव मापारी (ओबीसी व वैयक्तिक), संगीता गोविंद मापारी (महिला), प्रविण शांताराम क्षीरसागर (ओबीसी), विजय काशीराम चोपडे (ओबीसी), अभिजीत संतोष मिरगे (ओबीसी), विलास बचाटे (ओबीसी), उज्ज्वला विलास बचाटे (महिला), रूपाली विष्णू बनकर (महिला), किरण विनायक राठोड (व्हीजेएनटी), शिवाजी धोटे (एससी/एसटी), गणपत कुसळकर (व्हीजेएनटी), गिरीश नारायण कोल्हे (वैयक्तिक), उषा नारायण कोल्हे (महिला), नितीन भगवान शिंगणे, मंगल गंगाधर जाधव, शिलाबाई शंकर आरमाळ, सुधाकर म्हस्के, बाबूराव शिरसाठ, गणेश रामदास बुरकुल (देऊळगाव राजा कृषी सेवा सोसायटी), गणेश बुरकुल (ओबीसी), तसेच प्रतापराव जाधव, राजश्रीताई प्रतापराव जाधव आणि उल्हास गणपतराव जाधव.

You Might Also Like

श्रावणातील पहिल्या सोमवारी धाड नाका मित्र मंडळाची भव्य कावड यात्रा
गंधारी जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली; विद्यार्थ्यांना आल्या पावली घरी परतावे लागले, पालक संतप्त
सर्पदंशावर वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू; चाळीस टपरी गावाचा रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर
‘तुम्ही बुलढाण्यात भाजप वाढवा, आम्ही चिखलीत शिवसेना वाढवतो’; गायकवाडांचा महालेंना थेट इशारा
जिल्हा सामान्य रुग्णालयात फायर मॉक ड्रिल; आपत्कालीन परिस्थितीचा प्रत्यक्ष सराव
TAGGED:उल्हास जाधवओबीसी मतदारसंघकृषी प्रक्रिया पणन मतदारसंघजिल्हा बँक निवडणूक 2026जिल्हा सहकारी बँक निवडणूकदेऊळगाव राजा कृषी सेवा सोसायटीनामांकन माघारनामांकन वापसप्रतापराव जाधवबुलढाणा जिल्हा बँक निवडणूकबुलढाणा न्यूजबुलढाणा राजकारणमहिला आरक्षित मतदारसंघराजश्रीताई जाधवराजेंद्र शिंगणेव्हीजेएनटी मतदारसंघ
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article दलित पँथर चळवळीचा संघर्ष रुपेरी पडद्यावर; पाच भाषांमध्ये संपूर्ण भारतात झळकणार
Next Article सीटूचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले जेलभरो आंदोलन; हजारो कामगारांचा सहभाग
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up