राज्यभरातील लाखो प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार
एसटी प्रवास महागला; १३.५६ टक्के भाडेवाढीला मंजुरी
एसटी प्रवास महागला; १३.५६ टक्के भाडेवाढीला मंजुरी
मुंबई : राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. वाढीव दर लवकरच लागू करण्यात येणार असून, या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
एसटी महामंडळाने वाढत्या आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे सादर केला होता. अखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या किमतीत झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल-दुरुस्तीवरील खर्चात झालेली लक्षणीय वाढ या सर्व बाबींचा विचार करून प्राधिकरणाने भाडेवाढीस मंजुरी दिली.
या निर्णयामुळे यापूर्वी साध्या बसेससाठी लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात येणार आहे. त्याऐवजी आता सर्व प्रकारच्या सेवांसाठी नव्या दरानुसार १३.५६ टक्के भाडेवाढ लागू होईल.
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, महामंडळाची आर्थिक शाश्वतता टिकवून ठेवणे, प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे तसेच वाढत्या खर्चाचा सामना करणे यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य ठरली आहे. गेल्या काही वर्षांत इंधन, सुटे भाग आणि देखभाल खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
दरम्यान, भाडेवाढीमुळे ग्रामीण भागातील तसेच नियमित एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असली, तरी महामंडळाने सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आणि आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रवासी सेवा कायम ठेवण्यासाठी निर्णय
ही भाडेवाढ एसटीची सेवा अधिक सक्षम आणि टिकाऊ बनविण्यासाठी करण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षित व विेशासार्ह प्रवासासाठी आवश्यक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण सेवा कायम राखण्यास त्यामुळे मदत होणार आहे. प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण यावेळी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचार्यांच्या विविध भत्त्यां ध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग आणि टायर यांच्या किमतीत झालेली वाढ यामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य ठरली
आहे. ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेण्यात आली आहे.
राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित सेवा देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर दाखविलेला विेशास कायम ठेवावा, ही अपेक्षा आहे.
बुलडाणा अर्बनच्या पिंपळगाव राजा शाखेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात
