बुलढाणा
बुलढाणा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर कपाटे Police Head Constable Digambar Kapate यांना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर कपाटे यांनी ३० मार्च रोजी अंढेरा पोलीस स्टेशन Andhera Police Station हद्दीत अफु या अंमली पदार्थ शेतात पिकविणार्या
आरोपी विरोधात एनडीपीएसट प्रमाणे कारवाई केली. यामध्ये १ किंव्टल ११ किलो अफू किंमत ४४ लाख ५३ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील उल्लेखनीय कामगिरी बदल दिगंबर कपाटे यांना पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक श्रोणिक लोढा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सन्मानित झाल्याबद्दल दिगंबरकपाटे यांचे कौतुक होत आहे.
