Deputy Chief Minister Eknath Shinde in Amravati today
बातमीविश्व टिम
अमरावती: नव्याने निर्माण होत असलेल्या बालकृष्णधाम येथे इस्कॉन रुख्मिणी वैदिक कल्चर सेंटर स्व. प्रविण मालू यांच्या ईच्छेनुसार उभारण्यात येत आहे. सदर इस्कॉन कल्चर सेंटर व स्व. प्रविण प्रणव मालू स्मृती प्रवेशद्वाराचे आणि भूमिदान एवमं भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवार, ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता गजाननधामच्या बाजूला मालू सिटी रेवसा रोड, बालकृष्णधाम येथे होत आहे. या सोहळ्याला श्रील लोकनाथ स्वामी महाराज, क्षेत्रिय सचिव इस्कॉन महाराष्ट्र व भक्तीपद्य सौरभ प्रचारक स्वामी महाराज उपस्थित राहणार आहेत.
मालू कस्ट्रशनचे संस्थापक स्व. प्रवीण मालू यांनी हयात असताना चार वर्षांपूर्वी इस्कॉनचे गुरुमहाराजांना इस्कॉन वैदिक कल्चर सेंटर व्हावे व त्यामध्ये भव्य असे इस्कॉन मंदिर स्थापित व्हावे असा संकल्प बोलून दाखविला होता. त्यानुसार त्यांचे पुतणे वरूण मालू यांनी कुठलाही विलंब न करता सदर संस्थेला एक लाख स्क्वेअरफूट म्हणजेच चार एकर जमिन दान दिली. सदर जमिनीची किंमत आज कोट्यवधीच्या घरात आहे. याचवेळी बाळकृष्णधाम येथे स्व. प्रविण प्रणव मालू स्मृती प्रवेशद्वाराचे सुद्धा भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत. सदर कार्यक्रमाला नागरिकांन व लाडया बहिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मालू कन्स्ट्रशनचे संचालक वरुण मालू यांनी केले.
यांची राहणार उपस्थिती
या प्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आ. रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. सुलभा खोडके, आ. संजय खोडके, माजी मंत्री प्रवीण पोटे, माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, शिवसेनाच्या प्रिती बंड, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार अभिजित अडसूळ, आमदार प्रवीण तायडे, माजी मंत्री कृपाल तुमाने, माजी स्थायी समिती अध्यक्ष मनपा बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुळकर्णी, प्रशांत देशपांडे आदी उपस्थित राहणार आहेत.
